IoT Technology: उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान: आयओटी सेन्सर्स

AI in Livestock Management: जास्त उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्णता ताण वाढतो, ज्याचा थेट परिणाम दूध उत्पादन आणि आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानातील IoT (इंटरनेट ऑफ थिंग्स) सेन्सर गोठा थंड आणि नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
Best sensors for livestock heat stress management
Best sensors for livestock heat stress managementAgrowon
Published on
Updated on

Smart Dairy Farming: उन्हाळ्यात वाढणारे तापमान हे पशुधनासाठी आव्हानाचे ठरते. जास्त उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्णता ताण वाढतो, ज्याचा थेट परिणाम दूध उत्पादन आणि आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानातील IoT (इंटरनेट ऑफ थिंग्स) सेन्सर गोठा थंड आणि नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.

१. तापमान सेन्सर

गोठ्यातील तापमान सतत मोजण्यासाठी तापमान सेन्सर वापरता येतात. तापमान ठराविक मर्यादेपेक्षा वाढले की हे सेन्सर लगेच सिग्नल देतात. त्यानुसार पंखे, फॉगर किंवा कूलिंग सिस्टिम (मिस्टिंग) सुरू होतात. त्यामुळे गोठ्यातील उष्णता कमी ठेवता येते आणि कमी वेळात गारवा पसरतो.

Best sensors for livestock heat stress management
Smart Dairy Technology: गोठे होताहेत ‘आयओटी’ स्मार्ट

२. आर्द्रता सेन्सर

तापमानासोबतच हवेतली आर्द्रताही महत्त्वाची असते. आर्द्रता जास्त असल्यास जनावरांना त्रास होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. तर कमी असल्यास वातावरण अतिशय कोरडे राहते. त्यामुळे आर्द्रता सेन्सर आर्द्रतेची योग्य पातळी राखण्यास मदत करतात आणि आवश्यक असल्यास कूलिंग सिस्टम नियंत्रित करतात.

३. वायू सेन्सर

गोठ्यात अमोनिया, कार्बन डायऑक्साइडसारखे वायू साचल्यास जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात त्यातून फार उष्णता बाहेर पडते आणि गोठ्याचे तापमान वाढते. वायू सेन्सर हे अशा वायूंची पातळी मोजतात आणि जास्त झाल्यास हवेचा प्रवाह म्हणजेच व्हेंटिलेशन वाढवण्यासाठी सिग्नल देतात.

Best sensors for livestock heat stress management
Robot in Dairy Farming: रोबोट बनले गोठ्यातील नवे सहाय्यक

४. वाऱ्याचा वेग आणि हवेचा प्रवाह सेन्सर

गोठ्यात हवा योग्य प्रमाणात फिरत आहे की नाही हे तपासण्यासाठी हे सेन्सर वापरले जातात. हवेचा प्रवाह योग्य वेगात असल्यास उष्णता कमी होते आणि गोठा थंड राहतो.

५. हालचाल सेन्सर

जनावरांची हालचाल आणि वर्तन तपासण्यासाठी मोशन सेन्सर वापरले जातात. जनावरं अस्वस्थ वाटत असल्यास किंवा जास्त हालचाल करत असल्यास हे उष्णतेचे संकेत असू शकतात. त्यामुळे वेळेवर उपाय करता येतात.

एकत्रित काम

हे सर्व सेन्सर एकत्रितपणे काम करून गोठ्यातील वातावरण सतत नियंत्रणात ठेवतात. तापमान वाढले की पंखे किंवा फॉगर आपोआप सुरू होतात आणि उष्णता कमी केली जाते. यासोबतच वायू सेन्सर, हालचाल सेन्सर देतात त्यामुळे मोबाईलवर त्वरित सूचना मिळाल्यामुळे पशुपालकांना वेळेवर जनावरांवर लक्ष देता येते. त्यामुळे गोठा नेहमी स्वच्छ, थंड आणि जनावरांसाठी आरामदायी राहतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com