Smart Dairy Technology: गोठे होताहेत ‘आयओटी’ स्मार्ट

Internet of Things: इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती आणि पशुपालनाला आधुनिकतेची जोड मिळू लागली आहे. या तंत्रज्ञानामुळे येत्या दोन वर्षांत देशातील पशुपालनाचे चित्र बदललेले असेल.
Modern Dairy
Modern DairyAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology: इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती आणि पशुपालनाला आधुनिकतेची जोड मिळू लागली आहे. या तंत्रज्ञानामुळे येत्या दोन वर्षांत देशातील पशुपालनाचे चित्र बदललेले असेल. प्रत्येक गोठ्यामध्ये सेन्सर बेल्ट, तापमान सेन्सर, स्वयंचलित हवामान केंद्र, मोबाइल ॲप, आरएफआयडी इअर टॅग आणि ईआरपी प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. जातिवंत दुधाळ पैदास, जनावरांचे आरोग्य, स्वच्छ दूध उत्पादनाच्या बरोबरीने वेळ आणि मजूर बचतीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक झाला आहे.

इस्राईलमधील सकाळी सहाची वेळ... आमची गाडी तेल अविव सोडून दक्षिणेकडील ॲराव्हा महामार्गाला लागली. अर्ध्या तासातच रस्त्याकडेने वाळवंट आणि वालुकामय टेकड्या दिसू लागल्या. नेगेव्ह वाळवंटातील याहेल किबुत्झच्या दिशेने माझा प्रवास सुरू होता. या ठिकाणी माझा मित्र मंगेश खजूर पॅकेजिंग उद्योग आणि आधुनिक डेअरी फार्ममध्ये कार्यरत असल्याने त्याला भेटण्यासाठी उत्सुक होतो.

पण या रखरखीत, उष्ण वाळवंटी भागात कोण कशाला संकरित होल्स्टिन फ्रिजियन गाई सांभाळेल, हा प्रश्‍न सातत्याने डोक्यात येत असतानाच बस ड्रायव्हरने याहेल किबुत्झ स्टॉप आल्याचे स्पीकरवर सांगितले आणि मी उतरलो. स्टॉपसमोरच याहेल किबुत्झच्या देखण्या प्रवेशद्वाराजवळ मंगेश आणि त्याचा स्थानिक मित्र उभा होता.

Modern Dairy
Dairy Farm Success Story : दुग्ध व्यवसायाच्या मार्गावर तांबिले कुटुंबाचा संघर्ष आणि विजय!

त्याने गेटवरील एका बॉक्समध्ये थंब पंचिंग केले आणि आम्ही आत शिरलो. येथे प्रत्येक किबुत्झला मुख्य दरवाजा असतो, पण तेथे वॉचमन ही भानगड नाही. किबुत्झमधील कार्यालयीन संगणकावर प्रत्येक नागरिकाचा थंब पंच, पासवर्ड नोंदविलेला असतो. इलेक्ट्रॉनिक यंत्रावर अंगठा ठेवला, पासवर्ड नोंदविला आणि तो जुळला तरच दरवाजा उघडतो. ही माहिती तंत्रज्ञानाची पहिली झुळूक होती.

किबुत्झमध्ये प्रवेश करताच अथक मानवी प्रयत्नांना दाद द्यावी लागेल अशी रचना. वाळवंटातील हे मानवनिर्मिती ओॲसिस म्हणावे लागेल. दोन खोल्यांची आरामदायी घरे, बाहेरच्या बाजूला छोटी बाग. संपूर्ण किबुत्झला काटेरी कुंपण आणि सेन्सर कॅमेरे बसवलेले. नागरिकांसाठी सर्व काही सुखसोयी आणि सुरक्षिततेसाठी बंकर्स.

या किबुत्झमधील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे खजूर, पमेलो फळबागेचे व्यवस्थापन, पॉलिटनेलमध्ये स्वीट पेपर, टरबूज, खरबूज लागवड, पशुपालन आणि वाळवंटातील पर्यटन. सर्व जण दैनंदिन कामामध्ये व्यस्त. या ठिकाणी परदेशातील मुले, मुली पर्यटनाच्या बरोबरीने आर्थिक मिळकत आणि नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी स्वयंसेवक म्हणून येथील खजूर लागवड आणि पॅकिंग उद्योग, डेअरी आणि पर्यटन केंद्रात काम करतात. त्यापैकीच माझा मित्र मंगेश.

Modern Dairy
Dairy Farming : तांबिले बंधूंचा दुग्ध व्यवसायाचा प्रवास

थोडी विश्रांती घेऊन मी मंगेश सोबत किबुत्झमधील डेअरी पाहायला निघालो. मुरमाड वालुकामय जमिनीवर उभारलेले मोठे पत्र्याचे शेड, मुक्त संचार गोठा आणि त्यामध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या शंभरहून अधिक होल्स्टिन फ्रिजियन गायी. कालवडी, वासरांसाठी वेगळे कप्पे. पशुखाद्य तयार करणारे टीएमआर यंत्र, सायलेज बंकर देखील दिसत होते. डेअरीच्या कार्यालयामध्ये एका मोठ्या फळ्यावर गोठ्यातील गायींचे क्रमांक वेगवेगळ्या रकान्यात चिकटवलेले होते.

त्यावरून गाय दुधात आहे की भाकड, आजारी आहे, कालवड आहे की नवजात वासरू हे कोणालाही स्पष्ट होत होते. त्यांची पेडिग्री संगणकावर उपलब्ध होती. इस्राईलमधील जातिवंत वळूची स्वतंत्र यादी तेथे लावलेली होती. कार्यालयाजवळ मिल्क पार्लर आणि दूध साठविण्यासाठी बल्क कूलरची सोय होती. तेथून हे दूध सर्व चाचण्या पार करत मुख्य डेअरीमध्ये जाते. गायींच्या गळ्यात सेन्सर बेल्ट आणि गोठ्यात ठिकठिकाणी सेन्सर आणि कॅमेरे दिसत होते.

Modern Dairy
Dairy Management : आधुनिक पद्धतीने गोठा व्यवस्थापनाच्या यशस्वी प्रवासाची कथा

परिसरातील तापमानात वाढ होताच या गोठ्याला लावलेले पत्र्याचे पडदे बंद होऊन आतील फॅन आणि मिस्टिंग यंत्रणा सुरू झाल्याने बाहेरील ४० अंश सेल्सिअस तापमानापेक्षा आतील तापमान किमान दहा अंश सेल्सिअसने कमी होऊन गायींना आरामदायी वातावरण तयार होत होते. गायी फॉगर्सच्या खाली उभारून थंड होत होत्या. हे सगळं स्वयंचलित पद्धतीने सुरू होते.

गोठ्यात फिरताना येथील पशुतज्ज्ञ म्हणाले, की आमच्याकडे वासरू जन्मले की त्यांची तत्काळ राष्ट्रीय पातळीवर नोंद करून टॅग क्रमांक दिला जातो. गोठ्यातील गायींच्या गळ्यातील सेन्सर टॅगच्या माध्यमातून आम्हाला संगणकावर त्यांच्या दिवसभरातील हालचाली, खाद्य ग्रहण, रवंथ, शारीरिक तापमानातील फरक, दूध उत्पादन आणि माजाची लक्षणे कळतात. त्यानुसार नियोजन केले जाते.

जातिवंत पैदाशीसाठी कृत्रिम रेतनाचा वापर होतो. आमच्या वातावरणाला अनुकूल अशी दुधाळ इस्रायली होल्स्टिन फ्रिजियन गाय आम्ही विकसित केली आहे. ही गाय दररोज सरासरी ३५ ते ४० लिटर दूध देते. एका वेतामध्ये १२ ते १४ हजार लिटर दुधाची सरासरी आहे. दूध काढण्यापूर्वी गायींना स्वयंचलित यंत्रणेने अंघोळ घातली जाते. त्यांच्या शरीराचे तापमान थंड झाल्याने चांगले दूध उत्पादन मिळते.

मिल्किंग पार्लरमध्ये आठ मिनिटांत यंत्राच्या साह्याने एका वेळी २४ गायींचे दूध काढले जाते. आम्ही पाच जण ही सगळी डेअरी सांभाळतो. आमच्यामध्ये एक पशुतज्ज्ञ आहे, तो सगळ्या तपासण्या करतो. त्यानुसारच काटेकोर नियोजन होते. मोबाइलवर दूध कमी झाल्याची नोंद झाल्यास तातडीने गाय बाहेर काढली जाते. याची संगणकावर नोंद होते. ‘हर्ड मॅनेजमेंट सिस्टीम’ आमच्या डेअरीचे संपूर्ण अर्थकारण सांभाळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com