Khapate Family Agrowon
यशोगाथा

Processing Industry : प्रक्रियेतून वाढवले स्व-उत्पादित मालाचे मूल्य

Self Produce Business : डाळ मिल, त्यातून डाळनिर्मिती, फिरत्या धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्राची सेवा आणि मसाले निर्मिती असे विविध व्यवसाय मोठ्या कष्टातून उभे करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले आहेत.

कृष्णा जोमेगावकर

New sources of income : नांदेड शहरापासून सुमारे शंभर किलोमीटरवर तेलंगण राज्याच्या शेजारी बन्नाळी (ता. धर्माबाद) गाव आहे. येथे दिगंबर शंकरराव खपाटे यांची १६ एकर शेती आहे. पारंपरिक शेतीतून उदरनिर्वाह करणे मुश्‍कील होत होते. परिणामी, दहावीचे शिक्षण झाल्यानंतर पूर्णवेळ ते शेतीकडेच वळले.

या काळात किसान संघाचे प्रांत प्रचारक दादा लाड यांनी गावातील पैसा गावातच राहावा, स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर दिगंबर यांनी शेतीत सुधारणा करून व्यावसायिकदृष्ट्या काय करता येईल याचा विचार सुरू केला.

प्रक्रिया उद्योगाची केली निवड

आपण एवढ्या कष्टाने धान्य पिकवतो, पण आपल्या मालाला समाधानकारक दर मिळत नसल्याची खंत दिगंबर यांना होती. स्व-उत्पादित मालाचे प्रक्रियेतून मूल्यवर्धन केल्यास नफ्यात वाढ होऊ शकते हे त्यांनी जाणले. त्यानुसार डाळनिर्मितीच्या उद्देशाने त्यांनी २०१८ मध्ये मिनी डाळ मिल सुरू केली.

अकोला येथून पावणेतीन लाख रुपयांत यंत्र आणले खरे. पण अजून पुरेशा भांडवलाअभावी उद्योग सुरू करताना अडचणी येऊ आल्या. घरचे कसलेच आर्थिक पाठबळ नव्हते. मग पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. अखेर २०२० मध्ये डाळ मिलसह शेवया निर्मिती, पिठाची गिरणी, विविध मसाले निर्मिती सुरू केली.

स्वच्छता व प्रतवारी यंत्राचा खुबीने वापर

डाळ मिल युनिटचा भाग म्हणून धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्रही मिळाले होते. त्याचा उपयोग वाढविण्यासाठी त्याचे रूपांतर फिरते यंत्र म्हणून करायचे ठरवले. त्यास लोखंडी चाके बसवून घेतली. बैलगाडी, रिक्षा यांच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते घेऊन जाणे शक्य होऊ लागले.

आज धर्माबाद, बिलोली तालुक्यांतील, तसेच तेलंगण राज्यातील गावांतील शेतकऱ्यांना दिगंबर या यंत्राची सेवा देतात. प्रति कट्टा (सुमारे ६० किलोचा) ९० रुपये असे शुल्क घेतले जाते. हे काम खरीप व रब्बी अशा दोन हंगामांत प्रत्येक दोन ते अडीच महिन्यांचे असते. यात सोयाबीन, तूर, उडीद, मूग, हरभरा आदींची स्वच्छता व प्रतवारी करून दिली जाते. या फिरत्या यंत्राच्या सेवेमुळे शेतकऱ्यांची घरबसल्या सोय झाली आहे. प्रत्येक हंगामात दिगंबर यांना त्यापासून चाळीस हजार ते पन्नास हजार रुपयांची कमाई होते.

प्रतवारी यंत्राची वैशिष्ट्ये

हे यंत्र ‘सिंगल फेज’ विजेवर चालणारे आहे. यात विजेचा कमी वापर होतो. त्यात पाच कप्पे आहेत.
पहिल्या कप्प्यातून ए ग्रेडचे धान्य तयार होते. यात काडी-कचरा विरहित, स्वच्छ, एकसारखा
दाणा बाहेर पडतो. दुसऱ्या कप्प्यात बी ग्रेडचे धान्य मिळते.पडते. या यंत्राच्या सेवेचा आणखी एक फायदा शेतकऱ्यांना मिळतो तो म्हणजे
भुस्सा, धसकटे यांचा वापर शेतासाठी होतो.

कच्चा माल येतो शेतीतूनच

दिगंबर यांना प्रक्रियेसाठी शक्यतो बाहेरून माल घेण्याची फार गरज पडत नाही. त्याची सर्व तरतूद
करताना त्यांनी ३५ एकर शेती दोन मित्रांच्या भागीदारीत खंडाने केली आहे. त्यात सर्व कडधान्ये घेतली आहेत. यंदा तीळ साडेसात एकरांवर आहे. जवस, आळीव यांना आरोग्याच्या दृष्टीने असलेली मागणी पाहता त्यांचीही लागवड आहे. रासायनिक अवशेषमुक्त किंवा सेंद्रिय पध्दतीचा अधिकाधिक वापर आहे. मसाले किंवा पावडरी तयार करण्यासाठी मिरची तसेच धने दहा एकरांवर आहे.

थेट विक्रीचा आधार

आपल्या सर्व मालाची विक्री करण्यासाठी दिगंबर विविध कृषी प्रदर्शने, शासनाचा विकेल ते पिकेल उपक्रम, धान्य महोत्सव, रानभाजी महोत्सव आदींमध्ये दरवर्षी सहभाग घेतात. केंद्र शासनाच्या
भरडधान्य योजनेतही भाग घेतला आहे. कृषी विभागाचे मोठे सहकार्य त्यांना होते. दरवर्षी प्रदर्शनातील सहभागातून असंख्य ग्राहक खपाटे दांपत्याने जोडले आहेत. त्यामुळे थेट ग्राहक विक्रीतून नफा चांगल्या प्रकारे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

खपाटे यांना मिळणारे दर (रुपये प्रतिकिलो)


डाळी
१) तूर- १७० ते १८०
२) हरभरा- ७५ ते ८०
३) मूग- १३० ते १५०
४) उडीद- १३० ते १५०

अन्य माल

५) तीळ - २००
६) मोहरी - १०० ते ११०
७) जवस - १५० ते १९०
८) आळीव - १५० ते २००
९) धने पावडर - १२०
१०) मिरची पावडर - १५० ते ३००

कष्टांना पर्याय नाही

दिगंबर सांगतात, की आम्ही गावापासून पाच किलोमीटरवरील धर्माबाद येथे तालुक्याच्या ठिकाणी भाडेतत्त्वावर घर घेऊन राहतो. मुलांची शिक्षणे चांगली होणे गरजेचे असल्याने हे ठिकाण निवडले. इथल्या कमी जागेतच प्रक्रियाही करतो. शेती, प्रक्रिया, व्यवसाय, प्रदर्शने हे सर्व सांभाळताना कष्ट खूप पडतात. पण त्याला पर्याय नाही.


दिगंबर खपाटे ,८८८८३०५९६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुर दरावर दबाव कायम; वांग्याच्या दरात सुधारणा, डाळिंब व मोहरी वधारली, बाजरीचा भाव स्थिर

Maize Snail Attack : उगवत्या अंकुरावर गोगलगायींचे आक्रमण

Cucumber Farming : खरीप काकडीचे अधिक उत्पादन शक्य

Adhala Dam : अकोला तालुक्यातील आढळा धरण भरले; शेतकरी सुखावला

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहीं ५ लाख ग्राहकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT