Success Story : शेतकऱ्यांच्या समस्येवर साईप्रसाद परिवाराची फुंकर

Solved the Problem of Farmer : नांदेड येथील साईप्रसाद परिवाराने शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सेवाभावी वृत्तीने विविध उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे.
Saiprasad Family
Saiprasad FamilyAgrowon

Success Story of Family : अडचणीतील शेतकरी, शेतमजूर, अनाथ, दिव्यांगांसह अनेकांच्या मदतीला धावून येणाऱ्या नांदेडच्या साईप्रसाद परिवाराचा लौकिक देशासह विदेशात पोहोचला आहे. सध्या देशासह इतर चाळीस देशांतील सदस्य साईप्रसाद परिवाराचे सदस्य आहेत.

यात शेतमजुरांसह, व्यापारी, व्यावसायिक, कर्मचारी, अधिकारी लोक सदस्य असलेल्या परिवाराने आजपर्यंत आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ, गरीब कुटुंबातील दिव्यांग मुला-मुलींचे पाचशेच्या आसपास मोफत विवाह लावून दिले आहे. यासोबतच पूरग्रस्त कुटुंबाला मदत, आकस्मिक आगीने संसार उघड्यावर पडलेल्यांना तातडीने मदत पुरविण्यात आली आहे

शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी साईप्रसादच्या वतीने बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या आहेत. मुलीच्या लग्नाची चिंता वधू पित्यांना असते. लग्न कार्यात होणाऱ्या खर्चामुळे अनेक शेतकरी पिता कर्ज घेतात.

हे खर्च फेडू न शकल्यामुळे पुढे यातून शेतकरी आत्महत्या सुद्धा होतात. अशा आत्महत्या होऊ नयेत यासाठी साईप्रसाद अशा अल्पभूधारक व गरीब शेतकरी- शेतमजूर कुटुंबातील वधूंचे मोफत विवाह लावून देते. आतापर्यंत असे ५०० विवाह साईप्रसादच्या वतीने लावण्यात आले आहेत.

Saiprasad Family
Sunil Kedar : सुनील केदार यांचा कारागृहातील मुक्काम वाढला; न्यायालयाने फेटाळला जामीन

११ जुलै २०१२ रोजी २३ सदस्य एकत्र येऊन साईप्रसाद परिवाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. यात पुन्हा अनेक सदस्य जोडले गेले. त्यानंतर कामाचा व्यासंग वाढत गेला. विवाहासाठी मुला-मुलींच्या पालकांना फक्त नोंदणी करावी लागते.

नोंदणी नि:शुल्क आहे. या विवाह सोहळ्यात साईप्रसाद परिवाराकडून वधू-वरांना कपडे, सोन्याचे मनी-मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, नवरीला शालू, संसारोपयोगी भांडे, कपाट, सागवानी बेड, गादी व कूलर असे एकूण सव्वा लाखांपर्यंत साहित्य दिले जाते.

हे लग्न भव्य अशा मंगलकार्यालयात शाही पद्धतीने लावले जाते. वधू-वरांना शाहीभोजमध्ये जेवण दिले जाते. कोणतीही उणीव त्या वधू-वरांना जाणवू नये यासाठी त्यांच्या सेवेत स्वयंसेवक दिले जातात.

Saiprasad Family
Farmer Feelings : उद्योजकतेला जोड उन्नत भावनांची

बळीराजा चेतना अभियान

साईप्रसाद परिवारांकडून शेतकरी आत्महत्या होवू नये यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जाते. यात अडचणीतील शेतकऱ्यांना वैद्यकीय मदत केली जाते. नायगाव तालुक्यातील कोपरा येथील तुकाराम वाघमारे या तरुण शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाला.

घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले होते. या परिवाराला साईप्रसाद परिवाराने ७० हजारांची मदत करून दहा शेळ्या घेऊन दिल्या. यातून ते परिवार उदरनिर्वाह करीत आहे. विद्यार्थ्यांना मदतज्ञान यज्ञाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य दिले जाते.

सातारा पूरग्रस्तांना मदत

सातारा जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार उघड्यावर पडले होते. यामुळे सातारातील सुखवाडी गाव दत्तक घेऊन साईप्रसाद परिवाराने चार दिवस १५० स्वयंसेवकासह मदत कार्य केले.

यात कपडे, अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. या वेळी त्यांनी संपूर्ण गावाला पाच दिवस सकाळी चहा नाश्ता, दोन वेळचे जेवण दिले. स्वयंसेवकांनी अनेकांच्या घरातील गाळ काढली. नदीघाट स्वच्छ केला.

गरजूंसाठी साईप्रसाद कल्पवृक्ष

साईप्रसादच्या वतीने दररोज गरजू रुग्णांना दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. यात वरण भात, भाजी व पोळी जवळपास १२०० लोकांना एका वेळेला दिले जाते. याच ठिकाणी दोन फिल्टर प्लॉंट बसविण्यात आले आहेत. दररोज रुग्ण व नातेवाइकांना १२००० लिटर शुद्ध पेयजल वाटप केले जाते.

याशिवाय यापरिसरात वड, पिंपळ, कदंब अशा गर्दछाया व ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड व जपणूक करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर हिरवागार व रुग्ण नातेवाइकांना आसरा घ्यायला कामी येतात. साईप्रसाद सर्व गरजूंसाठी एक कल्पवृक्ष म्हणून ओळखला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com