Jalgaon News: खानदेशात गहू पीक पेरणी सुरूच आहे. तसेच उशिरा पेरणीदेखील पुढील महिन्यात होणार आहे. मागील आठ ते १० दिवसांपूर्वी अनेकांची पेरणी झाली असून, त्यात सिंचनास वेग आला आहे. .गव्हाची पेरणी खानदेशात यंदा सुमारे ७५ ते ८० हजार हेक्टरवर होईल. जळगावातील पेरणी सुमारे ६० हजार हेक्टरवर होवू शकते. जळगाव जिल्ह्यात पेरणी ५० ते ५५ हजार हेक्टर एवढी अपेक्षित आहे. परंतु पेरणी सुमारे पाच हजार हेक्टरने वाढू शकतो. धुळे व नंदुरबारात सुमारे २० हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे..Wheat Sowing : खपली गहू पेरणी राहणार स्थिर.या दोन्ही जिल्ह्यांतही पेरणी स्थिर राहील. गव्हाचे दर मागील हंगामात बरे होते. यंदाही दरांबाबत अपेक्षा आहे. पण गहू मोफत रेशन दुकानांत उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकदा दर कमी असतात. दुसरीकडे पाऊसमान बरे असल्याने अनेक भागात कूपनलिका, विहिरींचे जलसाठे पुरेसे आहेत. गव्हास पाणी अधिक लागते. जलसाठे अधिक आहेत. बेवडसाठी अनेकांनी गहू पेरणी केली आहे..वेळेत पेरणीचा कलवेळेत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे पक्व होवून ते वेळेत मळणीवर येते. त्यातील मळणी मार्चमध्येच पूर्ण होते.दाणे कडक झाल्याने त्याचे सिंचन बंद करून मळणी सुरू होते. अधिक उष्णताही या कालावधीत नसते. यामुळे.Wheat Farming: दौंडमध्ये गव्हाचे पीक जोमात .शेतकरी वेळेत किंवा पुढील चार ते पाच दिवसात पेरणी पूर्ण करण्यावर भर देत आहेत. उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकात दाणेमार्चअखेरीस पक्व होतात. पण यंदा जानेवारीतही पेरणी होवू शकते. कारण अनेक जण केळी पीक रिकामे झाल्यानंतर त्यात पेरा करतील, अशी स्थिती आहे. काही भागात एकदा सिंचन झाले आहे. बीजांकुरणही झाले आहे..नदीकाठी अधिकचा पेरापेरणी तापी, गिरणा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रात होत आहे. अनेक शेतकरी परंपरेनुसार केळी पिकाच्या बेवडसाठी गहू पेरणी करतात. यामुळे पेरणीत घट जळगाव जिल्ह्यात होणार नाही. परंतु अनेकांनी गव्हाचे क्षेत्र कमी केले आहे. काहींनी गहू टाळून हरभरा व ज्वारीची पेरणी केली आहे. पण जलसाठे पुरेसे असल्याने गहू पेरणी अपेक्षेएवढी किंवा बऱ्यापैकी होणार आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, पाचोरा या भागात गहू पेरणी बऱ्यापैकी दिसत आहे. धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारात शहादा व तळोदा तालुक्यात गहू पीक होते..जिल्हानिहाय अपेक्षित पेरणीजळगाव जिल्हाएकूण अपेक्षित: ५०-५५ हजार हेक्टरप्रत्यक्ष वाढ संभाव्य: ५ हजार हेक्टरजिल्ह्यात अंदाजे ६०हजार हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकते.धुळे -नंदुरबारएकत्रित अपेक्षित: २० हजार हेक्टरपेरणी स्थिर राहण्याची शक्यता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.