Success Story : ओझरचा शेतकरीपुत्र झाला सहकार विभागाचा अधिकारी

Cooperative Department : निफाड तालुक्यातील ओझर मिग येथील लक्ष्मीनगरमधील शेतकरी कुटुंबातील तरुणाने दुसऱ्यांदा अधिकारीपदाला गवसणी घालत परिवारातील सदस्यांचे अश्रू पुसण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
Suraj Wanle
Suraj WanleAgrowon

Nashik News : निफाड तालुक्यातील ओझर मिग येथील लक्ष्मीनगरमधील शेतकरी कुटुंबातील तरुणाने दुसऱ्यांदा अधिकारीपदाला गवसणी घालत परिवारातील सदस्यांचे अश्रू पुसण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

राज्य सहकार व पणन विभागांतर्गत झालेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात येथील सूरज विठ्ठल वानले याने यश मिळवून थेट सहकार अधिकारी श्रेणी २ या पदाला गवसणी घातली.

सूरजचे वडील विठ्ठल वानले शेतकरी असून, शेतीचे उत्पन्न कमी होत असल्याने त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. आई गृहिणी आहे. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सूरजने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण विभागांतर्गत झालेल्या परीक्षेत लिपिकपद मिळविले होते.

Suraj Wanle
Cooperative Credit Society : सोसायट्यांमधील हेराफेरीला संगणकीकरणामुळे चाप

विज्ञान शाखेतील पदवीधर असलेल्या सूरजने पदवी परीक्षेनंतरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. येथील अभ्यासिकेत केलेल्या अभ्यासाच्या जोरावर पुण्यातील यशदा संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. त्या संस्थेत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

Suraj Wanle
Cooperative Department : अवैध धान्य खरेदीविरोधात सहकार विभागाचे धाडसत्र

त्याचा फायदा त्याला पुढील परीक्षेत झाला. एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतही वनसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत सूरजने मजल मारली होती. अवघ्या काही गुणांवरून संधी हुकली. पोलिस उपनिरीक्षकपदाच्या २०२२ व २०२३ च्या मुख्य परीक्षेस पात्र असून, त्याचीही तयारी सूरज करीत आहे.

नियमितपणे केलेला अभ्यास व जिद्दीने उभे राहून कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर सहकार अधिकारीपदी विराजमान झाला. निकाल समजताच कुटुंबातील सदस्यांनी व मित्र परिवाराने डीजेच्या तालावर सूरजची मिरवणूक काढली. औक्षण करताना उपस्थित सर्वांनीच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com