Nanded News: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एक लाख जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील १६ तालुक्यात शुक्रवारी (ता. २१) विविध ग्रामपंचायतींमध्ये जलतारा कामाचा प्रारंभ करण्यात आला..जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते भोकर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये तर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या हस्ते लोहा व कंधार तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये, विभागीय वन अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते माहूर, किनवट व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतमधे तर उपजिल्हाधिकारी रोहयो संजीव मोरे यांच्या हस्ते हदगांव व अर्धापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये, .Washim Jaltara Project : प्रबळ इच्छाशक्तीने सिद्धीस नेला जलतारा प्रकल्प.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते देगलुर व बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायतीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड यांनी भोकर व मुदखेड तालुकयातील ग्रामपंचायतीत, उपसंचालक कृषी विभाग वानखेडे यांनी नायगांव व मुखेड तालुकयातील ग्रामपंचायतीमध्ये तर जिल्हा रेशीम विकास अधिकारी नरवाडे यांनी उमरी व धर्माबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये जलतारा कामाला सुरुवात केली..जलतारा हा मनरेगाच्या एनआरएम कामाच्या प्रकारामध्ये येतो. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी केल्यास कामाचे कुशल व अकुशलचे प्रमाण राखता येईल व मजुरांच्या हाताला काम मिळेल व नैसर्गिक संसाधन संवर्धन करण्यास मदत होईल..Jaltara Project : सातारा जिल्ह्यात ‘जलतारा’साठी काढले पाच हजार ७६९ खड्डे.३.६० लाख लिटर पाणी मुरविण्याची क्षमताजलतारामुळे शेतातील पाणी एकवटल्या जाते. उताराच्या ठिकाणी किंवा जेथे जमीन चिभडल्या जाते अशा ठिकाणी ५ फूट रुंद, ५ फूट लांब आणि ६ फूट खोल खड्डा करून त्यात मोठे व मध्यम दगड भरून जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून सुमारे ३.६० लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विहीर, बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते..पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढवणे व जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे. या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.