Chhatrapati Sambhajinagar News: गत आठवड्याच्या तुलनेत २१ नोव्हेंबर अखेर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी पेरणीची गती किंचित वाढली आहे. तीनही जिल्ह्यांत सुमारे सात लाख २७ हजार ५७४ हेक्टर क्षेत्राचे तुलनेत २ लाख ७६ हजार ८०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे..पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यातील अति पावसामुळे यंदा रब्बी पेरणीला विलंब होतो आहे. पूर्व पदावर येत असलेली वाफसा स्थिती तसेच खरिपाचे पीक हळूहळू काढले जात असल्याने रब्बी पेरणीला गती मिळते आहे. पेरणीचे अनेक टप्पे पडत असल्याने काही पिकांचा पेरणी कालावधी निघून जाण्याची ही शक्यता दाट आहे. त्यामुळे ज्या पिकांच्या पेरणीसाठी पुढाकार घ्यायचा त्या पिकाचे अपेक्षित क्षेत्र वाढेल याची शाश्वती कमीच आहे. शिवाय शेतकरीही आपल्याला जे शक्य, त्या पिकाच्या पेरणीला प्राधान्य देताना दिसत आहेत..Rabi Sowing: मॉन्सून्नोत्तर पावसामुळे रब्बीत पेरणीला विलंब .छत्रपती संभाजीनगर जिल्हाछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीच्या सर्वसाधारण दोन लाख ३८ हजार ८२१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३६ हजार ९५५ हेक्टरवर म्हणजे केवळ १५.४७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या सर्वसाधारण ४४ हजार १९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५,४५२ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. गव्हाच्या सर्वसाधारण ८६ हजार ६४६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ११ हजार ५६४ हेक्टरवर, मकाच्या सर्वसाधारण ३५ हजार १३२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९२४४ हेक्टरवर तर हरभऱ्याच्या सर्वसाधारण ६६ हजार २०९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १० हजार ५३० हेक्टर वर पेरणी झाली आहे..जालना जिल्हाजालना जिल्ह्यात रब्बीच्या सर्वसाधारण २ लाख ११ हजार८१९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७१ हजार ८९९ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या सर्वसाधारण १ लाख २ हजार १५७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २६ हजार ३७९ हेक्टरवर, गव्हाच्या सर्वसाधारण २६ हजार ८९० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १२ हजार २६४ हेक्टरवर,मकाच्या सर्वसाधारण १४ हजार ४०७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४६९२ हेक्टरवर, तर हरभऱ्याच्या सर्वसाधारण ६,१४७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात २८ हजार ४४४ हेक्टर वर पेरणी झाली आहे..Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा .बीड जिल्हाबीड जिल्ह्यात रब्बीच्या सर्वसाधारण २ लाख ७६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६७ हजार ९५० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये रब्बी ज्वारीच्या सर्वसाधारण १ लाख २८ हजार १०८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८० हजार ७२६ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. त्यापाठोपाठ गव्हाच्या सर्वसाधारण ३१ हजार १०२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १२ हजार ८४० हेक्टर क्षेत्रावर, मकाच्या सर्वसाधारण ३६३३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १००८ हेक्टरवर तर हरभऱ्याच्या सर्वसाधारण १ लाख ६ हजार २२९ सेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६२ हजार ६९७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे..दृष्टीक्षेप...गत आठवड्याच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांत रब्बी पेरणीची गती किंचित वाढली.मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांत २ लाख ७६ हजार ८०४ हेक्टरवर पेरणी पूर्ण.अतिवृष्टीमुळे पेरणी उशिरा सुरू.खरीप काढणी सुरू झाल्याने व वाफसा होत असल्याने आता पेरणी वेग घेते आहे.पेरणीचे अनेक टप्पे पडत असल्याने काही पिकांचा पेरणी कालावधी निघून जाण्याची शक्यता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.