Silk Production  Agrowon
यशोगाथा

Silk Industry : रेशीम उद्योग स्वयंपूर्णतेकडे...

Self Sufficiency of Silk Industry : मराठवाड्यातील रेशीम उद्योगाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे. कोष खरेदी बाजारपेठा उभ्या राहिल्यानंतर धागा निर्मिती, अंडीपुंज उत्पादन आणि आता प्रस्तावित असलेल्या धाग्याला पीळ देण्याच्या प्रक्रियेमुळे उद्योगाच्या विस्ताराला नवी जोड मिळणार आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Silk Production : रेशीम कोष उत्पादनासाठी अपारंपरिक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख. जवळपास १८ हजार एकरांवर रेशीम उद्योगासाठी अत्यावश्यक तुती लागवडीचा आपल्या राज्यात विस्तार झाला आहे. त्यातही मराठवाड्याचा वाटा जवळपास ६० टक्के आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी (२०१२-१३ मध्ये) मराठवाड्यात ४ लाख २८ हजारपर्यंत लागणारे अंडीपुंज आता ३६ लाखांवर लागतात.

यामध्येच रेशीम उद्योगाचे मराठवाड्यासाठीचे महत्त्व दडले आहे. तुती लागवड, अंडीपुंज वाटप, कोष उत्पादन, चॉकी केंद्र, कोष बाजारपेठ, बाजारपेठ इमारत, ऑटोमॅटिक रिलिंग युनिट, मल्टी एण्ड मशिन या रेशीम उद्योगातील महत्त्वाच्या घटकांत मराठवाड्याचा वाटा राज्याच्या तुलनेत ५० ते ८३ टक्के दरम्यान आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट

बीजोत्पादनात आद्य व नावलौकिक असलेल्या महिकोसारख्या नामांकित कंपनीने रेशीम कोष उत्पादनासाठी लागणाऱ्या अंडीपुंज उत्पादनात उडी घेतली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या अंडीपुंज उत्पादनासाठी लागणाऱ्या कोष उत्पादनात सहभागी करून घेतले आहे.

त्यामुळे त्यांचे रेशीम कोष उत्पादन उद्योगातील उत्पन्न जवळपास दुप्पट झाले आहे. राज्याला लागणाऱ्या अंडीपुंज उत्पादनात गडहिंग्लज येथील अंडी पूजन निर्मिती केंद्राचा वाटा लक्षात घेता अंडीपुंज निर्मितीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने या प्रयत्नाने मोठा हातभार लागणार आहे.

बीड, जालना होतोय रेशीम हब

मराठवाड्यात जवळपास चार ऑटोमॅटिक रीलिंग युनिट आहेत. जवळपास पाच ‘मल्टी एण्ड मशिन कार्यरत आहेत. कोष उत्पादन वाढत असल्याने त्यांची गरज सातत्याने वाढत आहे. आधी ‘मनरेगा’, त्यानंतर ‘पोकरा, त्यानंतर सिल्क समग्र आणि जिल्हा नियोजनमधील निधी नियोजनामुळे मराठवाड्यातील रेशीम उद्योगाला बळ मिळाले आहे.

२०१४ नंतर मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात रेशीम उद्योगाचा विस्तार झपाट्याने झाल्याचे दिसते. बीड आणि जालना जिल्हा रेशीम हब म्हणून पुढे येऊ पाहत आहेत. शेतकऱ्यांचा या उद्योगाकडे कल पाहूनच जालना, धाराशिव, बीड आदी ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम उद्योगाला आपल्या अजेंड्यावर प्राधान्याने घेतल्याचे दिसते.

वेगळा ठसा उमटविण्यासाठी सज्ज

मराठवाड्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठांमध्ये पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह इतर ठिकाणचे व्यापारी येऊन कोष खरेदी करत आहेत. जालन्याच्या बाजारपेठेत तर गुजरात, मध्य प्रदेश येथून उत्पादक कोष विक्रीसाठी घेऊन येत आहेत. पैठणीमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेला मराठवाडा पुन्हा एकदा रेशीम उद्योगात आपला ठसा उमटविण्यासाठी सज्ज आहे.

अंडीपुंज कोष ते वस्त्र निर्मितीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी पोषक स्थितीही यामुळे निर्माण होते आहे. त्यामुळेच इतर रेशीम पूरक, औषधीय महत्त्व असलेल्या उद्योगात उतरण्याची संधी मराठवाड्यातील अनेक जण शोधताना दिसतात. एकूणच रेशीम उद्योगाच्या राज्यातील वाटचालीत मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादकांची भूमिका ते उत्पादित करीत असलेल्या बायहोल्टाइन कोषामुळे महत्त्वाची राहिली आहे.

बाजारपेठा उभ्या राहिल्याने कोष विक्री व्यवस्था निर्माण झाली. दरही सरासरी प्रतिकिलो ४०० रुपयांच्या पुढे राहिल्याने शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे शेतकरी रेशीमकडे नगदी पीक म्हणून पाहताहेत.
महेंद्र ढवळे, ९४२१७०७९४८ उपसंचालक, रेशीम महाराष्ट्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT