Silk Industry : रेशीम उद्योग क्रांती घडवून आणेल

Silk Farming : कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम उद्योगाकडे जालना जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत.
Silk Industry
Silk IndustryAgrowon
Published on
Updated on

Jalna News : कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम उद्योगाकडे जालना जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत. तुती शेतीवर आधारित हा उद्योग जिल्ह्यातील शेती पद्धतीमध्ये निश्चितपणे क्रांती घडवून आणेल, असा विश्वास विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी शुक्रवारी (ता. ४) घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथे रेशीम उद्योगाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी वेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.

निपाणी पिंपळगाव येथील युवा शेतकरी सोमेश्वर दिगंबर वैद्य आणि नामदेव भीमराव माने यांच्या तुती शेती व रेशीम उद्योगाची विभागीय आयुक्तांनी पाहणी केली.

Silk Industry
Silk Farming : पाथरी तालुक्यातील राधेश्याम खुडे यांचे रेशीम शेती नियोजन

यावेळी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम उद्योग योजना व फायदे याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न व अर्थकारण समजावून सांगितले. रेशीम कोष विक्रीपासून चांगले उत्पादन घेतल्याबद्दल सोमेश्वर वैद्य यांचा विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते ‘ऑरेंज कॅप’ घालून सन्मान करण्यात आला.

Silk Industry
Silk Yarn Production : मराठवाड्यात ३४२ टन रेशीम सूत उत्पादन

तर त्यांच्या पत्नी सविता सोमेश्वर वैद्य यांचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांच्या हस्ते ‘ऑरेंज कॅप’ घालून सन्मान करण्यात आला. श्री. अर्दड यांनी रेशीम उत्पादक शेतकरी नामदेव भीमराव माने यांच्या रेशीम किटक संगोपन केंद्राचीही पाहणी करून माहिती घेतली.

पाहणीदरम्यान निपाणी पिंपळगावचे सरपंच प्रतिभा प्रदिप बिरनावळे, रवना गावचे सरपंच संभाजी देशमुख, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी सखाराम पवळ, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, एस.आर.जगताप, अनिरुद्ध धांडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com