Agriculture nechnization Agrowon
यशोगाथा

Agriculture Mechanization : यांत्रिकीकरणातून बटाटा, कांदा शेतीत आली सुलभता

विकास जाधव 

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यातील खटाव या दुष्काळी तालुक्यात उरमोडी धरणाचे पाणी पोहोचले आहे. त्यावर शेती बागायत करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. तालुक्यातील म्हासुर्णे गावातील राजाराम नाना माने व त्यांचे धाकटे बंधू सर्जेराव हे प्रगतशील शेतकरी आहेत. वडिलांकडूनचशेतीचे धडे मिळत गेल्याने दोन्ही भाऊ शेतीत रमत गेले.

राजाराम त्या काळचे मेकॅनिकल डिप्लोमाधारक आहेत. कुटुंबाची २० एकर शेती असून, पाच ते सहा एकर खंडाने केली जाते. पूर्वी पारंपरिक शेतीत मजूरटंचाई, कामांच्या वेळा, कमी उत्पादन अशा अडचणी जाणवायच्या.

पाण्याची टंचाई असल्यामुळे नवीन प्रयोग करता येत नव्हते. दरम्यान, सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाचे पाणी आल्याने पाण्याची उपलब्धता होऊ लागली. त्यामुळे पीक पद्धतीची घडी बसवणे व यांत्रिकीकरण करणे शक्य झाले.

शेतीचे केले यांत्रिकीकरण

कांदा व बटाटा ही माने बंधूंची प्रमुख पिके आहेत. दोन्ही पिके मजूर आणि बैलांच्या साह्याने होत असल्याने अनेक अडचणी जाणवायच्या. त्यामुळे काही क्षेत्र कसण्यावाचून शिल्लक राहायचे. यावर उपाय म्हणून यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला.

ट्रॅक्टर खरेदी करून गुजरात येथून बटाटा लागवडीचे (प्लॅंटर) व काढणीचे यंत्र खरेदी केले. त्या वेळी प्लॅंटर एक लाख रुपये व हार्वेस्टर (२००७ मध्ये) ७५ हजार रुपये अशी गुंतवणूक केली.

कांद्यासाठीही पेरणीचे यंत्र त्या वेळी सुमारे २२ हजार रुपयांमध्ये खरेदी केले. सर्व अवजारे, एचटीपी पंप आदींचीही टप्प्याटप्प्याने खरेदी झाली. यातून शेती सुलभ होऊन कामे वेळेत होऊ लागली. पैशांची व श्रमांचाही बचत झाली.

बटाट्याची शेती

सुरुवातीच्या काळात चार ते पाच एकरांत होणारा बटाटा आता १५ एकर क्षेत्रावर होतो. लागवड १५ जून ते १५ जुलै दरम्यान चार फुटी गादीवाफ्यावर (बेड) होते. लागवडीसाठी अर्थातच ‘प्लॅटर’चा वापर होतो.

दोन ओळींत १८ इंच, तर दोन बेण्यांमध्ये वा रोपांमध्ये आठ ते नऊ इंच अंतर असते. ठिबक सिंचन आहेच. ‘प्लॅंटर’ घेण्यापूर्वी एक एकरांत लागवडीसाठी एक दिवसासाठी दहा मजूर लागायचे. सहा ते सात हजार रुपये खर्च यायचा. यंत्राच्या वापरामुळे अडीच तासांत एक एकर क्षेत्रावर लागवड करणे शक्य झाले.

खर्चही चार हजार रुपयांपर्यंतच येऊ लागला. त्यामुळेच बटाटा क्षेत्रात वाढ करणे शक्य झाले. सर्व बटाटा शेती २००७ पासून खासगी कंपनीसाठी करार पद्धतीने केली जाते. एकरी उत्पादन खर्च ५५ ते ६० हजार रुपये येतो. एकरी सरासरी सात टन उत्पादनमिळते.

अन्य पीक पद्धती व व्यवस्थापन

बटाटा, कांदा यांच्या व्यतिरिक्त अन्य पिकांची विविधताही टिकवली आहे. यात सुरू उसाचे एकरी ५० ते ५५ टन उत्पादन घेण्यात येते. उन्हाळ्यात तसेच अन्य हंगामात दोडका, वांगी, टोमॅटो, कलिंगड, टरबूज, बीन्स, ढोबळी मिरची ही पिके दरांचा अंदाज घेऊन केली जातात.

तीन विहिरी, दोन बोअरवेल असून, उरमोडी धरणातील पाण्याचा वापर होतो. दूध व शेणखतासाठी चार म्हशी, दोन गायींचेसंगोपन केले जाते. ‘प्लॅंटर’ व ‘हार्वेस्टर’ अन्य शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर दिली जातात. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात येते.

कुटुंब आहे एकसंध

माने कुटुंब एकसंध असून सर्व निर्णय एकमेकांच्या विचार विनिमयातून घेण्यात येतात. कुटुंबातीलपुढील पिढीतील अवधूत, अजिंक्य, आयुष, सार्थक ही मंडळी आपापल्या परीने मदत करतात.कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे रोपवाटिकेचे प्रशिक्षण घेतल्याने तरुण पिढीचा हातभार चांगला लाभलाआहे. घरातील महिला सदस्यांचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

तीन वर्षांतील उत्पादन

वर्ष क्षेत्र (एकर) उत्पादन

(एकूण) (टन) दर प्रति किलो (रुपये)

२०२० सात ५० ते ६० १७

२०२१ नऊ ६० ते ६६ १८

२०२२ १५ १०० ते ११० २४ ते २७

● सध्या १७ ते १८ रुपये दर मिळत आहे.

कांदा व्यवस्थापन

खरिपात तीन ते चार एकर तर रब्बीत दोन एकर कांदा असतो. यंत्राचा वापर करून पेरणी केली जाते. एकरी किमान ३० हजार रुपये खर्च येतो. खरिपात एकरी सहा ते सात टन उत्पादन मिळते. रब्बीत रोपे तयार करून लागवड केली जाते.

या हंगामात एकरी ५० ते ५५ हजार रुपये खर्च येतो. एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. या कांद्याची साठवणूक करून चांगला दर आला की मगच विक्री केली जाते. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. सरासरी दर प्रति किलो १० ते १५ रुपये मिळतो.

अन्य पीक पद्धती व व्यवस्थापन

बटाटा, कांदा यांच्या व्यतिरिक्त अन्य पिकांची विविधताही टिकवली आहे. यात सुरू उसाचे एकरी ५० ते ५५ टन उत्पादन घेण्यात येते. उन्हाळ्यात तसेच अन्य हंगामात दोडका, वांगी, टोमॅटो, कलिंगड, टरबूज, बीन्स, ढोबळी मिरची ही पिके दरांचा अंदाज घेऊन केली जातात.

तीन विहिरी, दोन बोअरवेल असून, उरमोडी धरणातील पाण्याचा वापर होतो. दूध व शेणखतासाठी चार म्हशी, दोन गायींचेसंगोपन केले जाते. ‘प्लॅंटर’ व ‘हार्वेस्टर’ अन्य शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर दिली जातात. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात येते.

कुटुंब आहे एकसंध

माने कुटुंब एकसंध असून सर्व निर्णय एकमेकांच्या विचार विनिमयातून घेण्यात येतात. कुटुंबातीलपुढील पिढीतील अवधूत, अजिंक्य, आयुष, सार्थक ही मंडळी आपापल्या परीने मदत करतात.कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे रोपवाटिकेचे प्रशिक्षण घेतल्याने तरुण पिढीचा हातभार चांगला लाभलाआहे. घरातील महिला सदस्यांचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT