Dharashiv News: नऊ वर्षांनंतर जिल्ह्यातील अ वर्ग नगरपालिका असलेल्या धाराशिवसाठी २० प्रभागांतून एक नगराध्यक्ष, ४१ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी १०८ मतदान केंद्रांवर मतदान होईल. तुळजापूरमध्ये ११ प्रभागांतून एक नगराध्यक्ष, २३ सदस्यांची निवड होईल. ३५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. नळदुर्गमध्ये १० प्रभागांतून एक नगराध्यक्ष व २० सदस्य निवडले जाणारे आहेत. त्यासाठी २० केंद्रांवर मतदान होणार आहे. उमरगा येथे १२ प्रभागांतून एक नगराध्यक्ष, २५ सदस्यांची निवड ३७ मतदान केंद्रातून होईल. मुरूममध्ये १० प्रभागांतून एक नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २० मतदान केंद्रातून होईल..कळंबमध्ये १० प्रभागांतून एक नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २४ मतदान केंद्रांवर होईल. भूममध्ये १० प्रभागांतून एक नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २१ मतदान केंद्रांतून होईल. परंडामध्ये १० प्रभागांतून एक नगराध्यक्ष आणि २० सदस्यांची निवड २२ मतदान केंद्रांतून होईल. जिल्ह्यातील एकूण आठ नगरपालिकांमध्ये ९३ प्रभाग आहेत. या प्रभागांतून आठ नगराध्यक्ष, १८९ सदस्यांची निवड २८७ मतदान केंद्रांतून होणार आहे. धाराशिव पालिकेसाठी ४८ हजार ४०७ पुरुष, ४५ हजार ५८३ स्त्री, १६ तृतीयपंथी असे एकूण ९४ हजार सहा मतदार आहेत..Crop Insurance Company : आठ वर्षांत विमा कंपन्यांची नऊ हजार कोटींची कमाई.तुळजापूरमध्ये १४ हजार ५३८ पुरुष, १५ हजार १७ स्त्री, सहा तृतीयपंथी अशी एकूण २९ हजार ५६१ मतदार आहेत. नळदुर्गमध्ये आठ हजार ७३६ पुरुष आणि आठ हजार ३८४ स्त्री असे एकूण १७ हजार १२० मतदार आहेत. उमरगामध्ये १६ हजार २३१ पुरुष, १५ हजार ५५५ स्त्री आणि पाच तृतीयपंथी असे एकूण ३१ हजार ७९१ मतदार आहेत. मुरूममध्ये सात हजार ७१४ पुरुष, सात हजार २०५ स्त्री आणि एक तृतीयपंथी असे एकूण १४ हजार ९२० मतदार आहेत. कळंबमध्ये १० हजार ७१३ पुरुष आणि १० हजार २४५ स्त्री मतदार असे एकूण २० हजार ९५८ मतदारआहेत..‘‘नगरसेतू’चा सांगोला पॅटर्न सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांत राबवणार’ .नगरसेवकापदासाठी ६४३ उमेदवारजिल्ह्यातील आठही पालिकांच्या नगरसेवकपदासाठी ६४३ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. यामध्ये धाराशिव २०१, तुळजापूर ६२, नळदुर्ग ८३, उमरगा ८८, मुरूम ५७, कळंब ६७, भूम ४२ आणि परंडा ४३ उमेदवारांचा समावेश आहे..आठ नगरपालिकांमध्ये दोन लाखांवर मतदारभूममध्ये नऊ हजार २२८ पुरुष आणि आठ हजार ८४९ स्त्री असे एकूण १८ हजार ७७ आणि परंडामध्ये आठ हजार ६२२ पुरुष, आठ हजार ६१२ स्त्री असे एकूण १७ हजार २३४ मतदार आहेत. जिल्ह्यातील या आठही पालिकांसाठी एकूण एक लाख २४ हजार १८९ पुरुष, एक लाख १९ हजार ४५० स्त्री आणि २८ तृतीयपंथी असे एकूण दोन लाख ४३ हजार ६६७ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत..या ठिकाणी होणार मतमोजणीधाराशिवची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये तुळजापूरची मतमोजणी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात नळदुर्गची मतमोजणी जिल्हा परिषद मुलांची शाळेच्या सभागृहात, उमरग्याची मतमोजणी अंतुबळी पतंगे सभागृहात, मुरूमची मतमोजणी नगरपालिका कार्यालयात, कळंबची मतमोजणी श्री संत गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, भूमची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, परंड्याची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृहात होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.