Pune News: आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी पाणी सुरक्षा, योग्य पीक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया उद्योग यात मदत करण्यासाठी ‘रयथन्ना मीकोसम’ मोहीम सुरू केली आहे. कृषीमंत्री अट्चन्नायडू यांनी गेल्या दीड वर्षांत शेतकरी कल्याणासाठी १ हजार कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दिली. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यभर या संबधी कार्यक्रम राबवले जात आहेत. हवामानाच्या संकटातही शेतकऱ्यांना स्थिर आधार देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचा तेथील सरकारचा दावा आहे..शेतकऱ्यांसाठी दीड वर्षांत १ हजार कोटींचा खर्च…कृष्णा जिल्ह्यात या मोहिमेचे उद्घाटन करताना राज्याचे कृषीमंत्री किंजापुरी अट्चन्नायडू म्हणाले, “गेल्या दीड वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी थेट १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच वापरले आहेत. २४ ते २९ नोव्हेंबर या सहा दिवसांत राज्यभर ‘रयथन्ना मीकोसम’ (शेतकऱ्यांच्या हितासाठी) अंतर्गत विविध कार्यक्रम होतील, तर ३ डिसेंबर रोजी शेतकरी सेवा केंद्रांवर कार्यशाळा घेतल्या जातील..Farmer Welfare: शेती आणि शेतकरी वाचला तरच देश पुढे जाईल.शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करणार…कृषिमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांना कोणत्याही संकटातही शेती सोडावी लागू नये, अशी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करायची आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे शेतकऱ्यांना खात्री देणारी दीर्घकालीन उपाययोजना आणत आहेत. या राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेती व संलग्न क्षेत्रांवर अवलंबून आहे आणि सरकारच्या महसुलातही शेतीचा मोठा वाटा आहे. १ हजार १०० किलोमीटर लांब किनारपट्टीमुळे चक्रीवादळांचा धोका नेहमीच असला तरीही सरकार वेळेवर मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत पुरवते, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन सुरक्षित राहील आणि वाढेल..Farmers Welfare: तामिळनाडूत शेतकऱ्यांना पीकविमा, पीककर्ज, बियाणे, खते मिळणार एकाच ठिकाणी; १ हजार फार्मर्स सेंटर्सची घोषणा.पुढे बोलताना ते म्हणाले, तंबाखू, आंबा, कांदा, नारळ अशा पिकांच्या बाजारहंगामात भाव पडू नयेत म्हणून सरकार थेट खरेदी करते. पीएम-किसान अन्नदाता सुखीभाव योजनेअंतर्गत आतापर्यंत ६८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ३ हजार २०० कोटी रुपयांची मदत मिळाली आहे..आंध्र प्रदेश मधील प्रत्येक शेतकरी कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हेच सरकारचे सर्वोच्च ध्येय आहे. तसेच ‘रयथन्ना मीकोसम’ मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना दीर्घकालीन संरक्षण, स्थिरता आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.