Raigad News: कोकणच्या निसर्गाची आणि समुद्रकिनाऱ्याची सर्वांनाच भुरळ पडते. यामुळे नागाव, काशिद, मुरूड, दिवे आगर आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांवर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून पोलिसांना गुंगारा देऊन त्यांच्याकडून समुद्रात पोहणे, पाण्यात उतरणे हे प्रकार केले जातात..त्यामुळे लाटांचे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने आजपर्यंत मुरूड व काशिद बीचवर बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे पर्यटकांनी आततायीपणा टाळला नाही, तर दुर्घटनांना आळा घालणे शक्य नाही..Pre-Monsoon Rain : पावसाचा जोर कमी, तरी भीतीचे ढग कायम.मुरूड बीचवर १९९१ मध्ये महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या सात कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता, तर त्यानंतर जुलै २०१४ मध्चे चेंबूरमधील सहा व्यावसायिकांना पोहताना जलसमाधी मिळाली होती. फेब्रुवारी २०१६ मध्ये तर पुणे येथील आबिदा इनामदार कॉलेजच्या.Monsoon 2025: माॅन्सून श्रीलंकेच्या किनाऱ्यावर; माॅन्सूनची आज अरबी समुद्रापर्यंत मजल.तब्बल १४ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर शिक्षण उपसंचालकांना परिपत्रके काढून सहलींवर निर्बंधचघातले होते. काशिद ग्रामपंचायतीतर्फे बीचवर फलक लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, तरीही पर्यटकांकडून पाण्यात उतरण्याचे प्रकार केले जातात. येथे २००८ पासून आजपर्यंत ५० हून अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे..गेल्या ८ नोव्हेंबर २०२५ रोजी अकोल्यातील शार्प विन क्लासेसचे संचालक व एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा पर्यटकांच्या निष्काळजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.