पश्चिम बंगालमध्ये बटाटा पीक लागवडीखालील क्षेत्रात यंदा वाढीची शक्यता कमी २०२४-२५ मध्ये सुमारे ४.९ लाख हेक्टरवर बटाटा लागवड झाली होतीकाही ठिकाणी अजूनही शेतात पुराचे पाणी साचून असल्याने लागवड करता आलेली नाहीगेल्या वर्षी शेतकऱ्यांना बटाट्याचे चांगले उत्पादन मिळाले होतेपण बटाट्याला चांगला भाव मिळाला नाही.Potato Cultivation: पश्चिम बंगालमध्ये बटाटा पीक लागवडीखालील एकूण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण राज्यातील काही प्रमुख बटाटा उत्पादक भागात पीक क्षेत्रात घट होऊ शकते..पश्चिम बंगाल हे देशातील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे बटाटा उत्पादक राज्य आहे. येथे २०२४-२५ मध्ये सुमारे ४.९ लाख हेक्टरवर बटाटा लागवड झाली होती. गेल्या वर्षी राज्यात बटाट्याचे एकूण उत्पादन सुमारे ११५ लाख टन होण्याचा अंदाज होता. हे बंपर उत्पादन आहे..Potato Varieties : शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट! जास्त उत्पन्न देणारे बटाट्याचे ४ नवीन वाण, जाणून घ्या पीक कालावधी."यावर्षी, पीक लागवडीखालील एकूण क्षेत्र आहे तसेच राहू शकते अथवा गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात किंचित घट होऊ शकते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना बटाट्याचे चांगले उत्पादन मिळाले. यामळे बटाट्याला चांगला भाव मिळाला नाही. परिणामी, यंदा लागवडीखालील क्षेत्र कमी होऊ शकते," असे पश्चिम बंगाल कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे एका वरिष्ठ सदस्याने म्हटले आहे. .राज्यात सुमारे ६५ ते ७० टक्के क्षेत्रावर बटाटा पीक लागवड पूर्ण झाली आहे. पुढील दोन आठवड्यात लागवड पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले..Potato Seed : राज्यात चार विद्यापीठे असूनही बटाटे बियाणे निर्मितीच होत नाही.दक्षिण बंगालमधील हुगळी, वर्धमान आणि पश्चिम मेदिनीपूर या तीन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात बटाटा उत्पादन घेतले जाते. दरम्यान, यावर्षी हुगळी जिल्ह्यातील काही शेतात अजूनही पुराचे पाणी साचून राहिले असल्याने पीक लागवड क्षेत्रात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती.."यावेळी आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पीक लागवड केली आहे. कारण माझ्या शेतातील काही भाग अजूनही पाण्याखाली आहे. अनेक शेतकऱ्यांना याच समस्येचा सामना करावा लागत आहे," असे हुगळी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सांगितले..दरम्यान, उत्तर बंगालमध्ये बटाटा लागवडीत सातत्याने वाढ होत आहे. कूचबिहार, जलपाईगडी आणि मालदा सारख्या जिल्ह्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्र वाढत असल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.