Mauli Brand Processing Industry Agrowon
यशोगाथा

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथील माधुरी अभय देशमाने यांनी आपल्या पाककलेतील कौशल्याला व उद्यमशीलतेला पुरेसा वाव दिला. त्याचे प्रक्रिया उद्योगात रूपांतर केले. आज सरबते, लोणची, चटण्या आदी पन्नासहून अधिक पदार्थांची निर्मिती त्या करीत असून पतीच्या मदतीने त्यांना सक्षम बाजारपेठही मिळवली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Women Empowerment : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हा दुर्गम तालुका आहे. येथील मलकापूर हे बाजारपेठेचे प्रसिद्ध आहे. येथील सौ. माधुरी अभय देशमाने यांनी फळप्रक्रिया उद्योग सुरू करून त्यात उल्लेखनीय झेप घेतली आहे. त्यांचे शिक्षण बीए पर्यंत झाले आहे. देशमाने कुटुंब तसे अल्पभूधारक. शेती अवघी दोन एकर. त्यात ऊस असतो. माधुरी यांचे पती अभय एका बँकेत शाखाधिकारी होते. कोरोना काळानंतर नोकरी सोडून त्यांनी पत्नीच्या प्रक्रिया उद्योगाला मदत करण्यास सुरवात केली. या दांपत्याला तीन मुले. पैकी मुलगा स्वरूप बी फार्मसीचे शिक्षण घेत असून ऐश्वर्या व एकता या उच्चशिक्षित आहेत.

उद्योगाची सुरवात

माधुरी यांना अन्न प्रक्रिया उद्योगात काहीतरी करावे, त्याद्वारे स्वतःची ओळख तयार करावी असे नेहमी वाटे. विशाळगड संस्थानचे सरकार डॉ. आशाराजे पंतप्रतिनिधी व क्षितीजाराजे पंतप्रतिनिधी-घन यांची विशाळगड फार्म अन्नपूर्णा संस्था आहे. सन २००४ च्या काळात या संस्थेस खाद्यपदार्थ पुरवण्याची संधी त्यांना मिळाली. सन २०१४ पासून मात्र माधुरी यांनी स्वतः पदार्थ निर्मितीत उतरण्याचे ठरवले. सुरवातीच्या काळात स्थानिक बाजारपेठच मर्यादित ठेवली. त्यानंतक टप्प्याटप्प्याने बाजारपेठेचा विस्तार करण्यास सुरवात केली.

विविध पदार्थांची निर्मिती

जिद्द, चिकाटी. धडपड व सातत्य यांच्या जोरावर माधुरी यांनी व्यवसायात आघाडी घेतली.आजमितीला पन्नासहून अधिक पदार्थांची निर्मिती त्या करतात. त्यातील पेये किंवा सरबत प्रकारात कोकम आगळ, आले (जिंजर), लेमन, आवळा, आंबा, संत्रा, अननस, गुलाब, सोलकडी, आदींचा समावेश आहे. लोणच्यांमध्ये आंबा, लिंबू, मिरची, माईन मुळा, कच्ची हळद आदींचा समावेशआहे. तर शेंगदाणे, खोबरे, जवस, तीळ, मेथी, कढीपत्ता आदी चटण्या व कुरड्या, नाचणी, तांदूळ साबुदाणा, उडीद आदींचे पापड किंवा सांडगे तयार होतात. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन २०० ग्रॅमपासून ते पाच किलोपर्यंत पॅकिंगमध्ये विविधता असते. जय भवानी फूड्स असे उद्योगाचे नाव असून माऊली प्रॉडक्ट्स हा ब्रॅंड तयार केला आहे.

कामकाज नियोजन

माधुरी यांच्या उद्योगात सहा स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे. पदार्थांच्या ‘ऑर्डर्स’ मोठ्या स्वरूपाच्या असल्यास त्यादृष्टीने उत्पादन, गुणवत्ता तपासणी, पॅकिंग करून माल ग्राहकांना वेळेत मिळेल यादृष्टीने पद्धतशीर नियोजन केले जाते. शाहूवाडीचा भाग डोंगराळ असल्याने वनसंपदा मोठी आहे. त्यादृष्टीने उन्हाळ्यातच कोकमसाठी रातांबे घेऊन साठवून ठेवले जातात. बहुतांश कच्चा माल स्थानिक ठिकाणाहूनच घेण्यात येतो. ऑर्डर नुसार कामाच्या कालावधीत बदल केले जातात.

ग्राहक कायमचा जोडला गेला

घरगुती पद्धतीनेच उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे त्यांचा स्वादही त्याच पध्दतीचा असतो. माधुरी उत्तम सुगरण आहेत. आई- वडिलांच्या प्रेरणेतूनच त्यांनी आपले पाककौशल्य विकसित केले आहे. पारंपरिक चवीत बदल होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असतो. घरगुती पद्धतीनेच मसाला मिश्रणाच्या पद्धती त्या वापरतात. उत्पादनांमध्ये कोणतेही कृत्रीम रासायनिक घटक समाविष्ट केले जात नाहीत. या सर्व गोष्टींमुळे दहा वर्षापासून कायमचा ग्राहक जोडला गेला आहे.

विक्री व्यवस्था

मुंबई भागातील व्यापारी स्वतःच्या वाहनाने माल घेऊन जातात. मलकापूर परिसरामधील विविध संस्था, व अन्य ठिकाणी मागणीनुसार देखील पदार्थ पोच केले जातात. पती अभय यांच्याकडे ‘मार्केटिंग’ व वितरणाची जबाबदारी आहे. काही प्रदर्शनामध्येही सहभाग घेऊन उत्पादनांचे ‘प्रमोशन’ व विक्री तेली जाते. सध्या कोल्हापूर शहरातील काही, मोठ्या संस्था, मॉल्स यांनाही संपर्क साधून बाजारपेठ वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात वितरक किंवा गुंतवणूकदार मिळवण्याचा प्रयत्न आहे.

आर्थिक नियोजन

सुरवातीच्या काळात स्व भांडवल उभा करून उद्योग थोड्या प्रमाणात सुरू केला. बाजारपेठेतील मागणी ओळखून पदार्थांची संख्याही वाढवण्याची गरज होती. अर्थात त्यासाठी आर्थिक नियोजन सर्वात महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने माधुरी यांनी मिळत असलेल्या नफ्यातील रक्कम पुन्हा उद्योगाच्या वाढीसाठीच वापरली. त्यामुळे गरजेनुसार भांडवल उपलब्ध होत गेले. आजमितीला वर्षाला २५ लाख रुपये उलाढालीपर्यंत माधुरी यांनी पल्ला गाठला आहे. आजमितीला दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत नफा मिळतो आहे. भविष्यात विस्तारित जागेत प्रक्रिया निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या खाद्यपदार्थांबरोबर जेवणाच्या ‘ऑर्डर्स’ही ही घेतल्या जात आहेत.

उद्योगाला प्रोत्साहनाची गरज

शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यामध्ये शेकडोंच्या संख्येने बचत गट आहेत. या गटातील महिलांकडे पाककलेचे चांगले कौशल्य देखील आहे. मात्र त्यांच्यातील उद्योगशीलतेच्या गुणाला वाव देण्याची गरज माधुरी बोलून दाखवतात. आपले स्थानिक पदार्थ जिल्ह्यासह देशात, परदेशापर्यंत पोचवण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. राजकीय नेतृत्व, प्रशासकीय यंत्रणा यांनी त्यादृष्टीने प्रक्रिया उद्योगासाठी महिलांना प्रोत्साहन द्यावे अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

माधुरी देशमाने ९९२३८ २८३५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

SCROLL FOR NEXT