Animal Market Agrowon
यशोगाथा

Akluj Cow Market : जर्सी गायी, शेळ्या-मेंढ्यांसाठी अकलूजच्या बाजाराची ओळख

Animal Market : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जनावरे बाजार गायी, म्हशींसह शेळ्या आणि मेंढ्यांसाठीही ओळखला जातो. विशेषतः जर्सी गायींसाठी बाजाराची सर्वदूर ख्याती आहे.

सुदर्शन सुतार

सुदर्शन सुतार

सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून माळशिरस तालुक्याकडे पाहिले जाते. तालुक्यातील अकलूज ही आशिया खंडातील सर्वांत मोठी नगरपंचायत म्हणून ओळखली जाते. परिसरातील ५० हून अधिक गावांचे रोजच्या व्यवहाराचे अकलूज हे प्रमुख केंद्र आहे. नीरा-देवघर आणि उजनी धरणांतील पाण्याच्या शाश्‍वत स्रोतामुळे इथला परिसर सधन झाला आहे.

त्यामुळे उसशेतीत या भागाची कायम आघाडी राहिली आहे. अलीकडील काही वर्षांत उसासह डाळिंब, केळी, द्राक्ष या फळपिकांबरोबर मका, बाजरी उत्पादनात माळशिरस तालुक्याने बाजी मारली आहे. या शेतीला दुग्ध व्यवसायाची उत्तम जोड मिळाली आहे.

नव्हे, प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात एक-दोन जर्सी गायी किंवा म्हशी हमखास दिसून येतातच. अनेक शेतकरी व विशेषतः युवा शेतकरी पूर्णवेळ दुग्ध व्यवसायात उतरले आहेत. काही शेतकऱ्यांकडे १० ते २० जर्सी गायींचा गोठा आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय या दुहेरी
आर्थिक उलाढालीमुळेच अकलूजची मुख्य बाजारपेठ आकारास आली. त्यात बाजार समितीचे योगदान मोठे आहे.

वर्षाकाठी ३२५ कोटींची उलाढाल

सहकारमहर्षी (कै.) शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने १९५० मध्ये अकलूज बाजार समितीची स्थापना झाली. आज बाजार समितीची वाटचाल ७५ वर्षाकडे सुरू आहे. सुरुवातीला अगदी मोजकीच भुसार धान्ये आणि भाजीपाल्याचे व्यवहार येथे व्हायचे. आता सर्व प्रकारची भुसारधान्ये, विविध प्रकारचा भाजीपाला आणि प्रामुख्याने केळी, डाळिंबाचे व्यवहार होतात.

येथे सध्या २५० अडत व्यापारी, तर ३५० पर्यंत खरेदीदार आहेत. बाजार समितीची वर्षाकाठची एकूण उलाढाल सुमारे ३२५ कोटी रुपयांपर्यंत आहे. बाजार समितीचे विद्यमान सभापती मदनसिंह मोहिते पाटील तर उपसभापती मामासाहेब पांढरे आहे. अन्य १८ संचालक बाजार समितीच्या कामकाजावर लक्ष ठेवतात.

उपबाजारांद्वारे विस्तार

बाजार समितीचा अलीकडील काही वर्षांत चांगलाच विस्तार झाला आहे. नातेपुते, माळशिरस, शिंदेवाडी, वेळापूर आणि पिलीव या पाच ठिकाणी उपबाजार सुरू करण्यात आले आहेत. नातेपुते येथे बाजार समितीच्या मालकीची २० एकर, माळशिरस आणि शिंदेवाडीला प्रत्येकी तीन एकर अशी २६ एकर जमीन आहे. अकलूजसह या पाचही ठिकाणी चोख व्यवहार होतात. नातेपुते येथे गूळ आणि मक्याची मोठी बाजारपेठ तयार झाली आहे.

जर्सी गायी, शेळ्या-मेंढ्यांना पसंती

अकलूज बाजार समितीत खात्रीशीर जनावरांची खरेदी-विक्री होते. त्यामुळेच जिल्ह्यासह नगर, सातारा, पुणे, सांगली या भागांतून मोठ्या प्रमाणात जनावरे येथील बाजारात येतात. सर्वाधिक जर्सी गायी आणि शेळ्या-मेंढ्यांना पसंती मिळते. बाजारादिवशी किमान तीन हजार ते सर्वाधिक चार हजारांपर्यंत जनावरे बाजारात येतात. सकाळी सहा वाजल्यापासून बाजार भरण्यास सुरुवात होते. दुपारी एक वाजेपर्यंत व्यवहार चालतात.

जनावरांच्या किमती

गायी किंवा म्हशींच्या खरेदी-विक्रीची किंमत त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार ठरते. जर्सी गाय
किमान ५० हजार रुपये ते दीड लाख रुपये, जर्सी कालवड १५ हजार ते ४० हजार रुपये, म्हैस
३० हजार ते सव्वा लाख रुपये, रेडा वीस हजार ते ३० हजार रुपये, बैल २० हजार ते ८० हजार रुपये, शेळ्या किमान ५ हजार ते कमाल वीस हजार रुपये, मेंढी किमान दोन हजार, पाच हजार ते
सर्वाधिक ३५ हजार रुपये असे सर्वसाधारण दर मिळतात.

बाजार समितीतील सुविधा

-बाजार समितीच्या दहा एकर परिसरात बाजार भरतो. सोमवार हा त्याचा दिवस.
-जनावरांसाठी प्रशस्त असे आठ निवारा शेडस.
- जनावरांसाठी चढ-उतारासाठी धक्का उभारला आहे.
-पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा.
-दहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे.

बाजार शुल्क

पणन विभागाच्या नियमानुसार शुल्कांची वसुली होते. अन्य कोणताही अधिभार घेतला जात नाही. गाय, म्हैस, बैल आदींसाठी प्रवेश शुल्कापोटी पाच रुपये तर जनावरांच्या खरेदीवर शेकडा एक रुपया पाच पैसे याप्रमाणे बाजार शुल्क आकारले जाते.

मागील दोन महिन्यांतील बाजारातील आवक, विक्री

महिना- डिसेंबर
महिना -----------प्रकार- जनावरे आवक (कंसात झालेली विक्री) )
----
डिसेंबर-------जर्सी गायी ---------------------३८१० (१९९५)
बैल----------------------------११० (५२)
रेडा-----------------------------१८० (११०)
म्हैस---------------------------२१० (९५)
शेळ्या-------------------------९७०९ (४५८२)
मेंढ्या--------------------------१२६० (९९७)
-----------------------------------------------
नोव्हेंबर
--------जर्सी गायी ---------------------२८८० (७९५)
बैल----------------------------५३० (१९०)
म्हैस---------------------------१६७० (८७०)
रेडा-----------------------------३८० (५५)
शेळ्या-------------------------८५३० (५७५५)
मेंढ्या--------------------------१८४२ (८५६)

आमच्याकडील जनावरे बाजाराला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. शेतकऱ्यांना पुरेशा सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. येत्या काही दिवसांत नातेपुते येथेही हा बाजार भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजेंद्र काकडे, सचिव, अकलूज बाजार समिती
दसरा ते दिवाळी या साधारण महिनाभराच्या काळातच बाजारात जनावरांची आवक कमी होते. मात्रइतर ११ महिने बाजार चांगला भरतो. सध्या गाई, म्हशींची संख्या बाजारात वाढली आहे.मात्र किमतीत फारसा फरक पडलेला नाही.
महादेव म्हेत्रे, खरेदीदार व्यापारी, अकलूज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT