Parbhani News: परभणी येथील पशुवैद्यकशास्त्र व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशू चिकित्सालयामध्ये प्रथमच एका श्वानामध्ये यशस्वीरीत्या रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्यूजन) करण्यात आले आहे, अशी माहिती पशू चिकित्सालय प्रमुख डॉ. मंजूषा पाटील व सहायक प्राध्यापक डॉ. पंकज हासे यांनी दिली..या संदर्भात डॉ. हासे म्हणाले, की मुंबई येथील पशुवैद्यकशास्त्र महाविद्यालयात असताना ४० ते ५० श्वान व मांजरामध्ये रक्तसंक्रमण केल्याचा अनुभव आहे. पशुवैद्यकशास्त्र महाविद्यालयात याआधी गायीमध्ये रक्तसंक्रमण केलेले आहे. परंतु यंदा श्वानामध्ये रक्तसंक्रमण करण्यात आले..Veterinary Clinic: पशुवैद्यकीय दवाखान्यांचे पालटणार रूपडे.विजयानंद तुपसुंदर यांच्या श्वानाच्या (वय ९ वर्षे) प्लिहावर गाठ (स्प्लीन-ट्यूमर) आल्यामुळे शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. परंतु त्याच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ४.४ ग्रॅम टक्के एवढे अल्प होते. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे तुपसुंदर यांनी श्वान बरा होण्याची आशा सोडून दिली होती..त्यांना श्वानाचे रक्त वाढविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी दात्या श्वानाकडून रक्त मिळाल्यानंतर तुपसुंदर यांच्या श्वानामध्ये रक्तसंक्रमण करण्यात आले. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण १०.३ ग्रॅम टक्के झाले. या श्वानावर बुधवारी (ता. १७) शस्त्रक्रिया करून प्लिहावरील गाठ काढण्यात आली..Veterinary Clinic: पशुवैद्यकीय दवाखान्यांचे पालटणार रूपडे.ही गाठ पुढील निदानासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली. ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशू चिकित्सालय प्रमुख डॉ. मंजुषा पाटील, शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. शरद चपटे, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पार पाडल्याचे डॉ. हासे यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर श्वानाची प्रकृती चांगली आहे..पशुरक्त पेढी स्थापनेसाठी प्रस्तावश्वान, मांजर या पाळीव प्राण्यांची संख्या शहरामध्ये वाढत आहे. गाईमध्ये ११ प्रकारचे रक्तगट असतात. श्वानामध्ये ११, तर मांजरामध्ये ३ प्रकारचे रक्तगट असतात. या प्राण्यांवर उपचारासाठी गरज पडल्यास रक्त उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी पशू रक्तदात्यांनी पुढे आले पाहिजे. त्यादृष्टीने पशुवैद्यकशास्त्र व पशुविज्ञान महाविद्यालयात रक्तपेढी (ब्लड बँक) स्थापन करण्याचा प्रस्ताव ‘माफसू’कडे पाठविला आहे. पशू रक्त साठविण्यासाठी आवश्यक पिशव्या तयार करण्याचे प्रस्तावित आहे, असे डॉ. पंकज हासे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.