डॉ. प्रवीण बनकर, डॉ. स्नेहल पाटील
Services of Government Agriculture Department : राज्य आणि केंद्र सरकारचे कृषी विभाग त्यांच्या विस्तार सेवांद्वारे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि माहिती देतात. भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या संकेतस्थळावर विविध उपक्रमांची माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे अशा संकेतस्थळावर कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, तंत्रज्ञान, माहितिपत्रके, प्रशिक्षण इत्यादी बाबत सविस्तर माहिती प्रसारित केली जाते.
‘ॲग्रोवन’ कृषी दैनिक तसेच कृषी मासिके आणि जर्नल्समधून देखील पशू व्यवस्थापनाची माहिती दिली जाते. दरवर्षी ठरावीक कालावधीत कृषी आणि पशू प्रदर्शन, मेळावे, शंकरपट, बैलगाडा शर्यत यांसारख्या उपक्रमातून नवनवीन माहिती मिळते. नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पशू व्यवस्थापन, दुग्ध तंत्रज्ञान व मत्स्य विज्ञान विद्याशाखामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासह संशोधन व विस्तार कार्य करीत आहे.
कृषी विज्ञान केंद्र
कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांच्यासह पशुपालकांना पीक आणि पशू व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते. जागरूक पशुपालकांनी आपल्या परिसरातील कृषी विज्ञान केंद्रास आवर्जून भेट द्यावी.
देशातील कृषी विज्ञान केंद्रांची माहिती https://kvk.icar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विविध कृषी विद्यापीठ तसेच पशुवैद्यकीय विद्यापीठांच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. विविध संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक, चर्चासत्रे यांच्या माध्यमातून नवनवीन उपक्रमांची माहिती येथील तज्ज्ञ देतात.
देशातील कृषी विज्ञान केंद्रांनी मोबाइल अॅप्स विकसित केली आहेत. आपण आपल्या गुगल प्ले स्टोअरवर याबाबत माहिती घ्यावी.
पशुवैद्यकीय दवाखाना आणि रुग्णालय
स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना आणि रुग्णालयामधील तज्ज्ञांकडून पशू आरोग्य आणि व्यवस्थापनाबाबत माहिती मिळते. स्थानिक पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून पशुपालकांनी वेळोवेळी पशू व्यवस्थापन, आरोग्य, आहार, पैदास, इत्यादी घटकांबद्दल मार्गदर्शन घ्यावे.
ऑनलाइन पोर्टल
राष्ट्रीय पशुपोषण व शरीरक्रियाशास्त्र संशोधन संस्था (NIANP), बंगलोर आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB), आनंद (गुजरात) यासारख्या संस्थांच्या संकेतस्थळावर प्रशिक्षणाबाबत माहिती उपलब्ध असते.
पशू संवर्धन संघटना
इंडियन व्हेटर्नरी असोसिएशन (IVA), भारत कृषक समाज इत्यादी संघटना अनेकदा शेती आणि पशू व्यवस्थापनाबाबत कार्यशाळांचे आयोजन करतात.
रेडिओ आणि टीव्ही
किसान कॉल सेंटर आणि कृषी दर्शन यासारखे कार्यक्रम शेतीविषयक मार्गदर्शन आणि सल्ला देतात. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे विविध नामवंत तज्ज्ञ हे स्थानिक आकाशवाणी व दूरदर्शन केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. एम किसान पोर्टलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित करत असतात.
सोशल मीडिया आणि ऑनलाइन गट
व्हॉट्सअॅप गट, फेसबुक गट यांसारखे प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी उपयुक्त ठरले आहेत. शेतकरी व पशुपालक यांनी या समाजमाध्यमांचा उपयोग आपल्या ज्ञानवृद्धीसाठी जरूर करावा.
- डॉ. प्रवीण बनकर,
९९६०९८६४२९
(डॉ. प्रवीण बनकर हे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे सहायक प्राध्यापक आहेत. डॉ. स्नेहल पाटील या पंचायत समिती, अकोला येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) आहेत.)
विविध उपयुक्त ॲप
पशुधन व्यवस्थापन : लाइव्हस्टॉक फार्म मॅनेजमेंट यासारखे अॅप शेतकऱ्यांना जनावरांचे आरोग्य, लसीकरण, प्रजनन आणि उत्पादन डेटा तपासणीसाठी उपयुक्त ठरतात.
हवामान अंदाज अॅप : काही अॅप्स हवामानाचा अचूक अंदाज देतात. यातून शेतकऱ्यांना जनावरांची काळजी आणि व्यवस्थापनासाठी योजना आखण्यात मदत होते. दामिनी अॅप आपल्याला परिसरात होणाऱ्या वीजवर्षावाबाबत माहिती देते.
कृषी मंडी अॅप : कृषी बाजार आणि किसान नेटवर्क यासारखे प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना खरेदीदारांशी जोडतात. त्यांना त्यांच्या पशुधन उत्पादनांची प्रभावीपणे विक्री करण्यास सक्षम करतात.
पशुधन बाजार : शेतकऱ्यांना पशू, खाद्य आणि इतर संबंधित उत्पादने ऑनलाइन खरेदी आणि विकण्यास काही अॅप उपयुक्त आहेत.
फिरते पशुवैद्यकीय टेलिमेडिसीन : ई-पशू चिकित्सा यासारखे प्लॅटफॉर्म दूरस्थ पशुवैद्यकीय सल्ला आणि पशुधनाच्या आरोग्याविषयी माहिती देतात.
कृषी ज्ञान प्लॅटफॉर्म : इफ्को किसानसारखे अॅप पशुधन शेती पद्धती, बातम्या आणि घडामोडींची भरपूर माहिती देतात.
आधार-आधारित पशुधन ओळख : पशू आधार यासारखे उपक्रम चांगल्या व्यवस्थापनासाठी पशुधनाची डिजिटल ओळख आणि नोंदणी करण्यात मदत करतात.
सरकारी अॅप : काही राज्य सरकारांनी पशुधन योजना, अनुदान आणि संसाधनांची माहिती देण्यासाठी ‘हरियाना पशुधन'' यासारखे अॅप विकसित केले आहेत.
डिजिटल पेमेंट अॅप : पशुधन आणि संबंधित उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीसाठी रोखरहित व्यवहार काही ॲप सुलभ करतात.
कृषी शिक्षण व्हिडिओ : काही प्लॅटफॉर्म पशुधन शेती तंत्र, रोग व्यवस्थापन याबाबत सूचनात्मक व्हिडिओ प्रसारित करतात.
पशुधन पोषण कॅल्क्युलेटर : विविध पशुधन प्रजातींसाठी योग्य पोषण आवश्यकतांची गणना करण्यात काही अॅप्स उपयुक्त आहेत.
टीप ः कोणतेही डिजिटल साधन वापरण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता, वापरकर्ता पुनरवलोकन आणि तुमच्या विशिष्ट पशुधन शेतीच्या गरजांशी सुसंगतता पडताळण्याची खात्री करावी.
महत्त्वाचे संकेतस्थळ
भारत सरकार ः कृषी विभाग : https://agricoop.gov.in
भारत सरकार ः पशुसंवर्धन विभाग: https://dahd.nic.in
महाराष्ट्र शासन ः कृषी विभाग : https://krishi.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन ः पशुसंवर्धन विभाग : https://ahd.maharashtra.gov.in
विद्यापीठांचे संकेतस्थळ
कृषी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणसोबत प्रायोगिक स्तरावर संशोधन होते. त्यातील आलेल्या निष्कर्षांनुसार शेतकरी व पशुपालक यांना मार्गदर्शन केले जाते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी ः https://dbskkv.org,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर ः https://mpkv.ac.in
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ः https://www.vnmkv.ac.in
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ः https://www.pdkv.ac.in
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर ः https://www.mafsu.in
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.