आकाराने लहान पण दुधातील फॅट जास्त असलेली जर्सी गाय

आकाराने लहान पण दुधातील फॅट जास्त असलेली जर्सी गाय. सध्या ग्रामीण भागात देशी गायीबरोबर जर्सी आणि एच.एफ गायीच संगोपन केलेजाते.मुळात जर्सी ही विदेशातील म्हणजे आयलंड ऑफ जर्सी या बेटातील मूळ स्थान असलेली, आकाराने लहान असलेली गायहोय.
jersey
jersey

आकाराने लहान पण दुधातील फॅट जास्त असलेली जर्सी गाय. सध्या ग्रामीण भागात देशी गायीबरोबर जर्सी आणि एच.एफ गायीच संगोपन केले जाते. मुळात जर्सी ही विदेशातील म्हणजे आयलंड ऑफ जर्सी ( iland of jersey) या बेटातील मूळ स्थान असलेली, आकाराने लहान असलेली गाय होय. 

दुधाळ जनावरांमध्ये आकाराने सर्वात लहान पण शरीराच्या आकाराने उत्तम दूध (milk) उत्पादन असलेली गाय (cow) म्हणून जर्सीची ओळख आहे. जर्सीच्या दुधातील फॅटचे (fat) प्रमाण ५.५ टक्क्यापर्यंत असू शकते.

हेही पाहा-  गिर गायीबद्द्लची माहिती 

इतर विदेशी जनावरांच्या मानाने ही जनावरे उष्ण हवामानात चांगल्या प्रकारे तग धरून राहू शकतात. या गायीचा दूध देण्याचा कालावधी ३०० दिवसांचा असून सरासरी उत्पन्न ४००० लिटर तर सरासरी आयुष्य १२ वर्षापर्यंत असते.

विदेशी जनावरांमध्ये त्यांच्या पाठीवर वशिंड (hump) नसते, मानेखाली लोंबकळणारी पोळी (dewlap) देखील नसते. यांचा रंग लाल किंवा फिक्कट लाल असा आढळून येतो. जर्सी गायीचे कपाळ रुंद असून डोळ्यांचा आकार मोठे असतो. या गायी मध्यम आकाराच्या असतात. याचा रंग लाल, कपाळ रुंद आणि डोळे मोठी असतात. याचे वजन ४०० ते ४५० किलो असते. या गायी दिवसाला १२ ते १४ लिटर दूध देत असतात. या गायीचे कान ताठ असतात. जर्सीची शिंगे आकाराने छोटी असतात. मादीचे वजन-४५० किलो तर नराचे वजन ५०० किलोपर्यंत असते. एका वेताला ४००० ते ५००० किलो दुधाचे उत्पादन मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com