Bhandara News: गोसेखुर्द धरणांतर्गत पवनी व लाखांदूर तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९९७-९८ मध्ये डावा मुख्य कालवा व उपकालव्यांच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. मात्र तब्बल २५ वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही डावा कालवा व त्यास जोडलेले उपकालवे अद्याप अपूर्णच आहेत. परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाणी साचून तालुक्यातील हजारो हेक्टर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. .१९८८ मध्ये ‘इंदिरा सागर’ या नावाने गोसेखुर्द धरणाच्या कामास सुरुवात झाली. धरण पूर्ण झाल्यानंतर पवनी व लाखांदूर तालुक्यातील एकूण २८,९४२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्यासाठी डाव्या मुख्य कालव्याची उभारणी प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार १९९७-९८ मध्ये सुमारे २२.९३ किलोमीटर लांबीचा डावा कालवा आणि त्यास जोडलेले उपकालवे बांधण्याची योजना आखण्यात आली..Irrigation Issue: ‘पालखेड’च्या काँक्रिटीकरणास तीव्र विरोध.मागील २५ वर्षांत पवनी व लाखांदूर परिसरात कालव्यांची काही कामे पूर्ण झाली असली, तरी लाखांदूर तालुक्यातील चौरास परिसरातील डावा कालवा व संबंधित उपकालव्यांची कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत. याच अपूर्ण कालव्यांमुळे पावसाळ्यात कालव्यातील पाणी शेतांमध्ये शिरते आणि दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांची नासाडी होते..Gosekhurd Irrigation Project: ‘गोसेखुर्द’च्या कंत्राटदाराला ४१ कोटींचा दंड.लाखांदूर तालुक्यातील सुमारे १९ हजार हेक्टर क्षेत्राला कायमस्वरूपी सिंचन सुविधा मिळावी, यासाठी डावा मुख्य कालवा व सर्व उपकालव्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे..अपूर्ण कालव्यांमुळे पूरस्थितीचा धोकागोसेखुर्द प्रकल्पांतर्गत डावा कालवा व त्याचे अनेक उपकालवे गेल्या २५ वर्षांपासून अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या कालव्यांमध्ये साचणारे पाणी चौरास क्षेत्रातील हजारो हेक्टर शेतजमिनीत शिरून पिकांचे मोठे नुकसान होते. पुढे हेच पाणी गावांतील नाल्यांमध्ये साचल्याने स्थानिक पातळीवर पूरपरिस्थिती निर्माण होते. परिणामी ढोलसर, विरली (बु.), ओपारा, पाहुनगाव, भागडी, कुडेगाव, रोहणी, किरमटी, परसोडी (नाग.), सावरगाव, गवराळा, खैरी पट आदी गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वारंवार पूरस्थिती उद्भवत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.