Agriculture Import-Export
Agriculture Import-Export  Agrowon
यशोगाथा

Agriculture Products Export : दुबईला थेट करा शेतीमाल निर्यात

Team Agrowon

धनश्री शुक्ल

Import and Export of Agricultural Products : भारतामध्ये उत्पादित झालेली ताजी फळे, भाज्यांना आखाती देशात चांगली मागणी आहे. त्यामुळे निर्यातीसाठी ही मोठी बाजारपेठ आपल्याला उपलब्ध आहे. आखाती देशांमध्ये बहुतांश क्षेत्र हे वाळवंट असल्यामुळे तेथे फळे, भाजीपाल्याचे उत्पादन होत नाही. म्हणूनच या देशांना ताज्या भाजीपाला आणि फळांसाठी आशियायी देशांवर अवलंबून राहावे लागते. यापैकीच एक प्रमुख देश आहे भारत.

आखाती देशांमध्ये भारतीय शेतीमालाला प्राधान्य मिळण्याचे कारण म्हणजे आपल्या उत्पादनाचा दर्जा, निर्यातीसाठी शेतीमालाची चांगली उपलब्धता. विशेषतः महाराष्ट्राचा विचार केला तर दुबई बाजारपेठेत निर्यातीला चांगली संधी आहे. या बाजारपेठेत लागणारा भाजीपाला आणि फळांचे दर्जेदार उत्पादन महाराष्ट्रातील शेतकरी घेत आहेत. आखाती देशात निर्यात करण्यासाठी आपल्याला लागणारा वाहतुकीचा वेळ देखील कमी म्हणजेच ४ ते ५ दिवसांचा आहे. तेथील बाजारपेठेची मागणी, आपल्याकडील निर्यातीच्या सुविधा लक्षात घेता महाराष्ट्रातून ताजा भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीला चांगली संधी आहे. त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.

दुबई : शेतीमालाचे आयात केंद्र

आखाती देशांमध्ये निर्यातीचे मुख्य ठिकाण म्हणजे दुबई. या ठिकाणी जबेल अली हे महत्त्वाचे बंदर आहे. जगभरातील आयात- निर्यातीच्यादृष्टीने महत्त्वाचे ठिकाण म्हणून दुबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. भारतातून ताजा शेतीमाल हा प्रथम दुबईमध्ये मागविला जातो. तेथून पुन्हा हा शेतीमाल रस्त्याच्या मार्गाने कुवेत, बहारीन, सौदी, अबुधाबी, शारजा आदी ठिकाणी पाठविला जातो.

त्यामुळे योग्य वाहतूक दरामध्ये शेतीमाल पोहचत असल्याने आर्थिकदृष्टया निर्यातदाराला फायदेशीर ठरते. आयात निर्यात, वाहतूक आणि विक्रीसाठी विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने अल्पावधीत दुबई हे जागतिक पातळीवर आयात-निर्यातीचे हब झाले आहे.

‘अल-अविर’ मार्केट

दुबईमध्ये निर्यात झालेला शेतीमाल हा ‘अल-अविर’ मार्केटमध्ये येतो. ‘अल-अविर’ हे खास ताज्या भाज्या, फळांसाठी होलसेल मार्केट म्हणून जगप्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये होलसेल विक्रेते, निर्यातदार आणि स्थानिक वितरकांचे वातानुकूलित गाळे आहेत. ज्याला ताजा भाजीपाला, फळे पाहिजे असतील ते याच मार्केटला पहिली पसंती देतात. हे मार्केट दुबईच्या सिटी सेंटरपासून ३५ किलोमीटरवर आहे. या मार्केटने मोठा परिसर व्यापलेला आहे. याठिकाणी दररोज विविध देशातून अंदाजे ७,००० टन फळे, भाज्यांची उलाढाल होते. याठिकाणी होलसेलर, निर्यातदार तसेच स्थानिक वितरक दर्जेदार शेतीमालाच्या खरेदीसाठी येत असतात.

या मार्केटमध्ये होलसेल खरेदीदारांचे अद्ययावत गाळे आहेत. या ठिकाणी आयात केलेल्या शेतीमालाचा कंटेनर प्लग इन करून ठेवलेला असतो. या कंटेनरमधूनच शेतीमालाची पुढे विक्री होते. जर एखाद्या दिवशी विशिष्ट शेतीमालाचे दर कमी झाले तर आपण हा शेतीमाल शीतगृहामध्ये ठेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला दिवसाप्रमाणे भाडे द्यावे लागते. जेव्हा दरात वाढ होईल त्याचदिवशी हा शेतीमाल आपण विकू शकतो. अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. या मार्केटमधील सुविधा लक्षात घेता विविध प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत, त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.

निर्यातीला मोठी संधी

महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात ताजा भाजीपाला आणि फळे दुबई बाजारपेठेत निर्यात होतात. आपल्या राज्यात निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधांची उपलब्धता आणि दर्जेदार शेतीमाल असल्याने आपल्याला भाजीपाला, फळांच्या निर्यातीला अमर्याद संधी आहेत. निर्यातीसाठी हवाई मार्ग आणि समुद्रमार्ग हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

पनवेलजवळील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरामधून समुद्रमार्गे दुबईला शेतीमालाची प्रामुख्याने निर्यात होते. हा शेतीमाल रिफर कंटेनरमधून पाठविला जातो. यामध्ये शेतीमालाचा दर्जा योग्य राहण्याच्यादृष्टीने तापमान नियंत्रित केलेले असते. हे तापमान आपण कोणता भाजीपाला, फळे निर्यात करत आहोत, यावर अवलंबून असते.

गेल्या काही वर्षांमध्ये दुबईमध्ये शेतीमालाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या बाजारपेठेमध्ये शेतीमालाचे निर्यातदार होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र निर्यातदार होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर याचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

आखाती देशात नेमक्या कोणत्या ठिकाणी निर्यात करायची? दुबई मार्केटलाच का प्राधान्य द्यायचे?

कोणत्या शेतीमालाची प्रामुख्याने मागणी आहे याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तसे पाहता महाराष्ट्रात उत्पादित होणारा विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीसाठी चांगली संधी आहे. कांदा, टोमॅटो, भेंडी, तोंडली, शेवगा, दुधी दोडका, कारले, मिरची, गवार, सुरण, भोपळा तसेच आंबा, पेरू, चिक्कू, केळी, द्राक्ष, डाळिंब, पपई इत्यादी फळांची मागणी वाढते आहे.

निर्यातीसाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतात, याचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

शेतीमालाची गुणवत्ता कशी असावी? दुबईमधील आयातदार कसा शोधायचा? याची तांत्रिक माहिती आपल्याला निर्यातदार म्हणून असणे आवश्यक आहे.

अभ्यास दौऱ्यामधील संधी

दुबईतील शेतीमाल, उत्पादने वितरण करणाऱ्या कंपन्यांना प्रत्यक्ष भेट.

भाजीपाला, फळे आयात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट भेट आणि चर्चा.

आयातदारांकडून निर्यातीची योग्य पद्धत, कागदपत्रे आणि इतर सुविधांबद्दल तांत्रिक माहिती.

दुबई बाजारपेठेची नेमकी मागणी काय? आयातदारांकडून कोणत्या गुणवत्तेच्या शेतीमालाची मागणी आहे ?

निर्यातीमधील संभाव्य धोके आणि संधी याबाबत दुबईमधील आयातदारांकडून थेट मार्गदर्शन.

ताजा भाजीपाला, फळांच्या निर्याती व्यतिरिक्त अजून कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत, त्याची माहिती.

दुबईमध्ये आयात झालेल्या शेतीमालाची किंमत कशी ठरते?

दुबईमध्ये स्वतःची कंपनी सुरू करायची असेल, तर कोणती कागदपत्रे लागतात, खर्च आणि टॅक्स किती लागतो, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.

सहभागी होण्यासाठी...

किमान सात महिन्यांची वैधता शिल्लक असलेला पासपोर्ट आवश्‍यक.

दौऱ्याचा कालावधी :

२८ जुलै ते २ ऑगस्ट

प्रवास : पुणे ते पुणे (विमानाने)

प्रति व्यक्ति शुल्क : १,२०,००० रुपये अधिक जीएसटी

शुल्कामध्ये समाविष्ट बाबी

विमान प्रवास आणि स्थानिक प्रवास खर्च.

व्हिसा खर्च  प्रवासी विमा खर्च

निवास खर्च  नाश्‍ता, दुपारी आणि रात्रीचे जेवण.

संध्याकाळी पर्यटनस्थळांना भेट.

यामध्ये पर्यटन स्थळांचे प्रवेश शुल्क आणि शॉपिंग खर्चाचा समावेश नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilesh Lanke News : खा. निलेश लंकेंचं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना आवाहन

Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’ची कामे ऑगस्टअखेर पूर्ण करा

Agricultural Pump Theft : कळवणमध्ये कृषिपंप चोरट्यांचा धुमाकूळ

Shetkari Samman Nidhi : नगरला ‘शेतकरी सन्मानच्या' कामावर ‘कृषी’चा बहिष्कार

Soybean Worm Infestation : सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT