Agrowon Dubai Agricultural Export Study Tour : ‘ॲग्रोवन’तर्फे जुलैमध्ये दुबईला शेतीमाल निर्यात अभ्यास दौरा

Agricultural Export Study Tour : शेतकऱ्यांना मिळणार निर्यातदार होण्याचे धडे - बाजारपेठांना भेटी, आयातदारांशी चर्चेची संधी
Export
ExportAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Agricultural Export : पुणे ः शेतीमालाच्या निर्यात व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्यांसाठी ‘ॲग्रोवन’तर्फे दुबईचा शेतीमाल निर्यात अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. २८ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान आयोजित केलेल्या या दौऱ्यात शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघ तसेच नवउद्योजक सहभागी होऊ शकतात.


भारतीय फळे व भाजीपाल्याची वेगळी चव, गुणवत्ता, वाहतुकीसाठी लागणारा अवघा चार दिवसांचा वेळ यामुळेच भारतीय शेतीमालाच्या आयातीसाठी सर्वात अनुकूल धोरण दुबई शासन राबवते आहे. दुबईतून वाढत असलेली शेतीमालाची मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग बनते आहे. हा शेतीमाल दुबईत निर्यात होतोच; पण तेथील आयातदार हाच शेतमाल पुन्हा विविध आखाती देशांसह युरोपातही पाठवतात. त्यामुळे दुबई आपल्यासाठी उत्तम बाजारपेठ बनली आहे. ‘ॲग्रोवन’च्या दुबई अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना दुबईतील बाजारपेठा बारकाईने बघता येतील. तसेच, तेथील आयातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी शेतीमाल निर्यातदार, तज्ञ आणि प्रशिक्षक धनश्री शुक्ल या दौऱ्यातील सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत.

Export
Farmers Study Tour : शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन

अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची दुबईत एक कार्यशाळादेखील होणार आहे. बाजारपेठेची मागणी व अपेक्षा, निर्यातीमधील संधी व जोखीम, कंटेनरची होणारी विक्री, दुबईत कंपनी कशी स्थापन करायची अशा विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांची माहिती या कार्यशाळेत मिळेल. २८ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान होत असलेल्या या दुबई अभ्यास दौऱ्यासाठी सात महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट स्वतःकडे असणे अत्यावश्यक आहे. दौऱ्याचे एकूण शुल्क प्रतिव्यक्ती १.२० लाख रुपये अधिक जीएसटी असून त्यात सर्व खर्च समाविष्ट आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी येथे नमूद केलेल्या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुकांनी १७ जूनपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी. नोंदणी केलेल्यांना २२ जून रोजी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
(अधिक माहितीसाठी वाचा विशेष लेख ः ॲग्रोवन पान ११)

पर्यटन स्थळांना भेटी
या दौऱ्यात दुबईतील पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधीही सहभागींना मिळणार आहे. बुर्ज खलिफा, दुबई फ्रेम, दुबई मॉल, दुबई फ्यूचर अशा लोकप्रिय स्थळांना भेटी आयोजित केल्या जातील.

https://forms.gle/wH4By9d6F542HDez7
------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com