Crop Loan : उद्दिष्टाच्या ५० टक्केच पीककर्ज वितरित

Kharif Season : दोन्ही जिल्ह्यांत जुलै महिना संपला तरी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी बँका उदासीनच आहेत. धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी बँकांना जिल्हा प्रशासनाने चांगलाच धडा शिकवला होता.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांत जुलै महिना संपला तरी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी बँका उदासीनच आहेत. धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी बँकांना जिल्हा प्रशासनाने चांगलाच धडा शिकवला होता.

त्यामुळे जिल्ह्यात यंदा राष्ट्रीय व खासगी बँकांच्या कर्ज वाटपात सुधारणा झाली आहे. अनेकवर्षे एक रुपयाही कर्ज न देणाऱ्या बँकांनी यंदा खाते उघडले आहे. लातूर जिल्ह्यात मात्र, धाराशिवच्या उलट स्थिती आहे. राष्ट्रीय बँकांनी २९ टक्के तर खासगी बँकांनी १४ टक्केच वाटप केले आहे.

लातूर जिल्ह्यात पाच बँकांनी तर धाराशिव जिल्ह्यांत दोन बँकांनी अजून एक रुपयाही कर्जवाटप केले नाही. लातूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली असून महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दोन्ही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी अग्रणी (लीड) बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे वाटपही ४७ टक्क्यांपर्यंत आहे.

Crop Loan
Crop Loan Delay: पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता

लातूर जिल्ह्यात डेव्हलपमेंट क्रेडिट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिंज बँक, इंदुसिंद व कोटक महिंद्रा बँकेने अद्याप खाते उघडले नाही. युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व आयडीबीआय बँकेने केवळ एक टक्का तर बँक ऑफ इंडियाने दोन, ॲक्सिस बँकेने पाच, कॅनरा बँकेने नऊ तर युको बँकेने केवळ ११ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने १५९ कोटी १९ लाखांचे उद्दिष्ट घेऊन २२ टक्के, इंडियन बँकेने २२ कोटी ५० लाखांपैकी २७ टक्के, एचडीएफसीने २५ तर आयडीबीआय बँकेने २१ टक्के कर्जाचे वाटप केले आहे.

बँक ऑफ बडोदाने २४ कोटी २७ लाखांचे वाटप करून ३१ टक्क्यांचे उद्दिष्ट साध्य केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ८१३ कोटी तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २३१ कोटींचे वाटप करून ८७ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. धाराशिव जिल्ह्यात बंधन आणि डीसीबी बँकेने अजून एक रुपयाही वाटप केले नाही. यात बंधन बँकेला एक कोटी ६३ लाख तर ॲक्सिस बँकेला ११ कोटी ४५ लाख वाटपाचे उद्दिष्ट आहे. धडा घेऊन इंदुसिंद बँकेने एक कोटी ६१ लाखांचे वाटप करून १४३ टक्के वाटपाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

Crop Loan
Crop Loan: नांदेडला पीककर्ज वाटपात राष्ट्रीय बँका अद्याप उदासीन

बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, युको बँक, आयसीआयसीआय बँक व रत्नाकर बँकांचे वाटप दहा ते वीस टक्क्यांच्या आतच आहे. पंजाब नॅशनल बँकेचे २५ टक्के तर बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, आयडीएफसी बँकांचे वाटप ३५ टक्क्यापर्यंत झाले आहे. कोटक महिंद्रा बँकेने यंदा खाते उघडले असून आतापर्यंत उद्दिष्टाच्या ४४ टक्के वाटप केले आहे. बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वाटप ६५ टक्क्यापर्यंत असून एचडीएफसी बँकेने ७६ टक्क्यापर्यंतचा पल्ला गाठला आहे.

लातूर जिल्ह्यातील पीककर्ज वाटप

खरीप हंगामातील उद्दिष्ट - दोन हजार ४५८ कोटी १४ लाख रुपये

आतापर्यंतचे वाटप - एक हजार ३६५ कोटी ४८ लाख (५६ टक्के)

राष्ट्रीय बँकांचे वाटप - २८५ कोटी ५२ लाख (२९ टक्के)

भारतीय स्टेट बँकेचे वाटप - २१३ कोटी ३० लाख (४६ टक्के)

खासगी क्षेत्रातील बँकांचे वाटप - ३४ कोटी ६५ लाख (१४ टक्के)

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाटप - २३१ कोटी ६५ लाख (८७ टक्के)

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाटप - ८१३ कोटी ६६ लाख (८७ टक्के)

कर्ज मिळालेले शेतकरी - एक लाख ४९ हजार ६३१

धाराशिव जिल्ह्यातील पीककर्ज वाटप

खरीप हंगामातील उद्दिष्ट - एक हजार ६५८ कोटी ५७ लाख रुपये

आतापर्यंतचे वाटप - ८७० कोटी ८६ लाख (५२.५१ टक्के)

राष्ट्रीय बँकांचे वाटप - १५६ कोटी ३७ लाख (३५.६१ टक्के)

भारतीय स्टेट बँकेचे वाटप - २१० कोटी ५६ लाख (४७.६७ टक्के)

खासगी क्षेत्रातील बँकांचे वाटप - ४६ कोटी २३ लाख (३०.७० टक्के)

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाटप - २९२ कोटी ९८ लाख (९१.५६ टक्के)

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाटप - १६४ कोटी ७२ लाख (५३.६४ टक्के)

कर्ज मिळालेले शेतकरी - ८४ हजार ९६२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com