Import-Export Policies : आयात-निर्यात धोरणात शेतकरी हित जोपासा

कापूस, तूर, तेल बिया वाण, कांदा असे वेगवेगळे धान्य जेव्हा बाजारात विक्रीसाठी येण्याची वेळ राहते, नेमके तेव्हाच किंवा त्याआधी आयातनिर्यात धोरणाबाबत केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतमालाचे दर कमी होतात.
Import-Export Policies
Import-Export PoliciesAgrowon

Akola News : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला वेगवेगळा माल जसा विक्रीसाठी बाजारात येतो, तेव्हा शेतीमालाचे दर कोसळतात. केंद्र शासनाच्या आयात-निर्यात धोरणाबाबतच्या निर्णयामुळे हे घडते. शेतकऱ्यांना पडेल भावात माल विकावा लागतो.

हे लक्षात घेता आयात निर्यात धोरणात शेतकरी (Farmer) हित जोपासले पाहिजे, अशी मागणी भारत कृषक समाजाने केंद्र शासनाकडे केली आहे.

याबाबत कृषक समाजाचे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले, की कापूस, तूर, तेल बिया वाण, कांदा असे वेगवेगळे धान्य जेव्हा बाजारात विक्रीसाठी येण्याची वेळ राहते, नेमके तेव्हाच किंवा त्याआधी आयातनिर्यात धोरणाबाबत केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतमालाचे दर कमी होतात.

Import-Export Policies
Ravikant Tupkar : आयात निर्यात धोरणात बदलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा ः तुपकर

शेतकऱ्यांना अशा स्थितीत नाइलाजास्तव कमी भावात माल विकावा लागतो. शेतकऱ्यांकडे साठवणुकीची व्यवस्था नसते. त्यांना उसने घेतलेले पैसे किंवा अति आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तोटा असला, तरी माल विकण्याशिवाय पर्याय नसतो. ही बाब नेहमीची झाली आहे.

केंद्राकडून शेतकरी हिताचा विचारच होत नाही, असे दिसून येते. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांसाठी ही फार मोठी डोकेदुखी बनली आहे.

महागाई वाढू नये म्हणून केंद्र शासन असे निर्णय घेते. मात्र शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा विचार कोण करणार, असा प्रश्‍नही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पाठविलेल्या निवेदनातून भारत कृषक समाज महाराष्ट्राचे चेअरमन डॉ. मानकर, डॉ. रमेश ठाकरे, प्रशांत चौधरी, वसंतराव महाजन, जगतराव पाटील, अॅड. विश्‍वासराव भोसले, शेषराव पाटील चिखलीकर, गोविंद रोकडे यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com