Rain Update : जतमध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी

Dam Water Storage : शिराळा तालुक्यासह वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. वारणा धरणात २८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. ५) रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.२ मिमी पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक २८.५ मिमी पाऊस पडला. या पावसाने जत तालुक्यात पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

शिराळा तालुक्यासह वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. वारणा धरणात २८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे विविध धरणांतून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे ः कण्हेर ५४०, राधानगरी १५००, दुधगंगा ९००, कासारी ३००, पाटगाव ३५०, हिप्परगी बॅरेज ३५ हजार १५९ व अलमट्टी धरणातून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Rain Update
Nanded Rainfall : नांदेडला जुलै महिन्यात ५३ मिलीमीटरची तूट

सांगली येथील आयर्विन पुलाजवळ १२ फूट तर अंकली पूल हरिपूर ७.१ फूट पाणी पातळी आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत पावसाने विश्रांती दिली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या आंतर मशागतींच्या कामांना गती आली होती. दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्यातील खरीप हंगाम काहीसा धोक्यात आला होता. मात्र मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

Rain Update
Sangli Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली

विविध धरणांतील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टीएमसी पुढीलप्रमाणे ः कोयना ८७.४५ (१०५.२५), धोम १२.५९ (१३.५०), कन्हेर ९.४४ (१०.१०), धोम बलकवडी ३.७६ (४.०८), उरमोडी ९.३८ (९.९७), तारळी ५.१६ (५.८५), वारणा २८.८१ (३४.४०), राधानगरी ८.१६ (८.३६), दूधगंगा २०.४४ (२५.४०), तुळशी ३.३४ (३.४७), कासारी २.२३ (२.७७), पाटगाव ३.७० (३.७२), अलमट्टी ११६.२० (१२३).=

गेल्या २४ तासांत व कंसात १ जूनपासून पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी

मिरज ६.९ (२१७)

जत २८.५ (१८९.५)

खानापूर-विटा ६.५ (१६७)

वाळवा-इस्लामपूर ५.९ (३४१.१)

तासगाव ८.६ (१९७.४)

शिराळा ४.३ (८५७)

आटपाडी १४.५ (२०१.७)

कवठेमहांकाळ ८.१ (१७६.५)

पलूस ८.९ (२८८.८)

कडेगाव १९.३ (२३४.४)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com