Allapalli Teak  Agrowon
यशोगाथा

Allapalli Teak : आलापल्ली सागवानाची संपूर्ण देशात ख्याती

Allapalli : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सागवानाला ब्रिटिश काळापासून इतिहास आहे. अयोध्येच्या राम मंदिराच्या बांधकामासाठी त्याच्या दर्जेदार लाकडाचा वापर केला जात आहे. संपूर्ण देशभरात या सागवानाची ख्याती पसरली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Allapalli Teak : र्गम, नक्षलप्रवणी अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आता पुसली जात आहे. या भागात खनिज खाणी, सागवान, तेंदूपत्ता हे नैसर्गिक स्रोत उत्पन्नाचा सक्षम पर्याय ठरली आहेत. येथील आलापल्ली सागवानाला ब्रिटिश काळापासूनचा इतिहास असून, देशभर त्याची ख्याती पसरली आहे.

त्याच्या भौगोलिक निर्देशांकाचा (जीआय) प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी सरकारी पेटंट कार्यालयाकडे देण्यात आला आहे. गडचिरोली येथील कोईतूर शेतकरी उत्पादक कंपनीच्या नावे तो सादर करण्यात आला आहे. बारीकराव धर्माजी मडावी हे कंपनीचे अध्यक्ष आहेत. जीआय प्राप्त झाल्यास या भागातील वनसंपदेला जागतिक मान्यता मिळण्यास मदत होणार आहे.

ब्रिटिश काळापासून इतिहास

मडवी, वनविभागाचे अधिकारी व ‘जीआय’साठी सहकार्य करणारे पुणे येथील गणेश हिंगमिरे यांनी सागवानाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी व सिरोंचा हे मुख्य तालुके आहेत. याच तालुक्‍यांतर्गत आलापल्लीचा समावेश होतो. अहेरी आणि सिरोंचा या दोन्ही तालुक्‍यांत सागवानव्याप्त वनक्षेत्र सर्वाधिक आहे. ब्रिटिश काळापासूनचा दोन्ही तालुक्यांत सागवानाखालील क्षेत्र सर्वाधिक होते.

आलापल्ली ही ब्रिटिशांची सागवान वखार होती. त्या काळात जलवाहतुकीचा पर्याय होता. परिणामी, जहाज बांधणीसाठी उत्तम टिकाऊ सागवान म्हणून या भागातील सागवानचा वापर ब्रिटिशांनी केला. शिवाय निर्यातीवरही भर दिला. ब्रिटिशांनी या भागातील सागवानाला ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ असे नाव दिले होते. या भागातील काही झाडे दोनशे वर्षे जुनी असल्याच्या खुणाही आढळतात. अशा झाडांचे संवर्धन ब्रिटिश आणि त्यानंतरच्या काळात करण्यात आले.

आलापल्ली सागवानाची वैशिष्ट्ये

दर्जाच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या सागवानांमध्ये कर्नाटक राज्याचा समावेश व्हायचा. आता त्याच श्रेणीत किंवा त्यापेक्षा सरस अशी ओळख आलापल्ली सागवानाला मिळाली आहे. आलापल्ली हा गडचिरोलीच्या दक्षिण विभागात येतो. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे या भागाने आपले वेगळे अस्तित्व राखले आहे.

पावसाळ्यात तर या भागातील निसर्ग आणि वनसंपदा आणखीच खुलते. देशाच्या अन्य भागांत आढळणाऱ्या सागवानाची उंची सरासरी ३० मीटरपर्यंत राहते. परंतु आलापल्ली सागवानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उंची ४० मीटरपर्यंत आढळली आहे. त्याच्या वृक्षाचा घेरही विस्तृत म्हणजे ७.८ मीटरपर्यंत आहे. झाडाची पाने ६० ते ५० सेंटिमीटर इतक्‍या मोठ्या आकाराची आढळतात. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत या वृक्षांना पांढरी फुले येतात. ती सर्वांचे लक्ष वेधणारी ठरतात.

अयोध्येतील मंदिराच्या कामात वापर

आलापल्ली सागवानाला देशभरातून मागणी राहते. वनविभागाच्या माध्यमातून लिलावाद्वारे त्याची विक्री होते. शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून सागवान लागवड आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. दर्जा आणि टिकाऊपणा यामुळे अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिर बांधकामात या सागवानाचा वापर केला आहे.

बारीकराव मडावी, ८८०५१२२०२२ (अध्यक्ष, कोईतूर शेतकरी उत्पादक कंपनी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT