Sharad Pawar : आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा : शरद पवार

Farmer Issue : राज्यातील शेतकरी काही दिवसांपासून अस्वस्थ होत चालला आहे. या आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील शेतकरी काही दिवसांपासून अस्वस्थ होत चालला आहे. या आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. कारणे सरकारला शेतकरी प्रश्‍नाकडे पाहायला वेळ नाही, हे दुर्देव आहे, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाचा पुणे स्टेशनजवळील सेंट्रल बिल्डिंग येथे शनिवारी (ता. ३०) सांगता झाली. त्या वेळी श्री. पवार बोलत होते.  यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे,

Sharad Pawar
Sharad Pawar : शेतकरी आक्रोश मोर्चाचा शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार संजय जगताप, अशोक पवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, अंकुश काकडे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, की मी कृषिमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिली फाइल अन्नधान्य संपल्याची आली होती. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अधिकाऱ्यांना परदेशातून अन्नधान्य मागविण्यासाठीचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी खरेदीचा प्रस्ताव सहीसाठी माझ्यासमोर ठेवला होता.

Sharad Pawar
Grape Season : द्राक्षाचा हंगाम गोड होण्यापूर्वीच आंबट

मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यातून भारताला तीन महिने पुरेल एवढाच धान्यसाठा असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी नाइलाजाने कृषिप्रधान असलेल्या देशाला परदेशातून धान्य विकत घ्यावे लागले. त्यानंतर मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना पुन्हा ताठ मानेने उभे केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुबलक धान्य उत्पादन करून जगातील अठरा देशांत अन्नधान्य पोहोचविण्याचे काम केले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, की शेतकऱ्यांप्रश्‍नी हा मोर्चा आहे. यात पाच ते सहा प्रश्‍न आहे, ते सोडविता येत नाही. आज महाराष्ट्र लुटला जातोय. सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. त्यात राज्यातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी देशात ‘इंडिया’ आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com