Monsoon  Agrowon
हवामान

IMD Rain Alert : विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

Rain Forecast : राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. आज (ता. १२) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आहे. उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात पावसाची मुख्यतः उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

ईशान्य राजस्थान आणि परिसरावर ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगर, दिल्ली, ओराई, सिधी, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्रापासून ते कर्नाटकपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा विरून गेला झाला आहे.

रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. आज (ता. १२) राज्यात पाऊस उघडीप देणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT