Monsoon Rain : जळगाव जामोद, शेगाव तालुक्यात यंदा पाऊस जोरावर

Rain Update : जळगाव जामोद, शेगाव या दोन तालुक्यात पहिल्या आॅगस्टच्या पहिल्या आठवडातच सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : बुलढाणा जिल्हयात या हंगामात काही तालुक्यांवर पावसाची कृपा अधिक झालेली आहे. प्रामुख्याने जळगाव जामोद, शेगाव या दोन तालुक्यात पहिल्या आॅगस्टच्या पहिल्या आठवडातच सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे. अद्याप पावणे दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून यावेळी या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार हे निश्‍चित झाले आहे.

जिल्हयात यावर्षी घाटाखालील तालुक्यांमध्ये संग्रामपूर वगळता उर्वरित ठिकाणी चांगला पाऊस होत आलेला आहे. घाटावरील तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांच्या आतच पाऊस नोंद झालेली आहे.

यातही यंदा लोणार तालुका बराच पिछाडीवर पडला आहे. या तालुक्यात मंगळवार (ता.सहा) पर्यंत ४०९ मिलिमीटर पाऊस म्हणजेच सरासरी ८७२ मिलिमीटरच्या तुलनेत ४६.८० टक्के एवढाच पाऊस झालेला आहे.

Monsoon Rain
Maharashtra Rain Update: विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता

यावरून जिल्हयात विविध भागात पावसाचे असमतोल प्रमाण असल्याचे समोर आलेले आहे. लोणार, संग्रामपूर या तालुक्यांमध्ये पाऊस कमी असल्याने अनेक भागात शेतांबाहेरही अद्याप पाऊस निघालेला नाही. त्यामुळे या तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जून महिन्यात दुसऱ्या आठवड्यात पावसाने जिल्हयात हजेरी दिल्यानंतर पेरण्यांना सुरुवात झाली. नंतर खंड पडल्याने पेरण्या रखडल्याने. पावसाच्या पुनरागमनासोबत पेरण्यांनाही सुरुवात झाली.

जिल्हयात पावसाप्रमाणेच पेरण्यांमध्येही असमतोलता निर्माण झालेली आहे. कुठे दोन महिन्याचे पीक तर कुठे एक-सव्वा महिन्याचे पीक आहे. यामुळे पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था बघायला मिळतात. शिवाय कमी पावसामुळे प्रकल्पांमध्ये साठ्यातही फारशी वाढ झालेली नाही.

Monsoon Rain
Rain Update: आज यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता

किडींचा प्रादूर्भाव वाढला

आजवर झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली पिके चांगल्या स्थितीत दिसून येतात. सोयाबीनची फुलोरावस्था सुरु झालेली आहे. कपाशीच्या पिकातही सुरुवातीला लागवड केलेल्या क्षेत्रात फुले, पात्या उमलल्या आहेत.

जिल्हयात सोयाबीन, कपाशी, तुरीनंतर मक्याची लागवडही मोठ्या क्षेत्रावर केली जाते. शेतकरी या पिकांच्या व्यवस्थापनात व्यस्त आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे सर्वच पिकांवर किडरोगांचा प्रादूर्भाव झालेला असून कीटक, कीडनाशकांची फवारणी जोरात होत आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका सरासरी प्रत्यक्षात टक्केवारी

बुलडाणा ८६० ४५६ ५३.२

चिखली ७८५ ४१५ ५२.८९

देऊळगावराजा ७०४ ३९० ५५.४८

सिंदखेडराजा ८०१ ४२२ ५२.७०

मेहकर ८३८ ४४३ ५२.८४

खामगाव ७१६ ४८३ ६७.४७

शेगाव ६८२ ५१४ ७५.४०

मलकापूर ७०५ ४७८ ६७.७७

नांदुरा ७४६ ४२२ ५६.६६

मोताळा ७१२ ४५० ६३.२२

संग्रामपूर ७६७ ३८६ ५०.३३

जळगाव जामोद ७०७ ५४७ ७७.३८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com