Kolhapur/ Satara / Sangli News : कोल्हापूर जिल्ह्याला मंगळवारी (ता. ६) सलग दुसऱ्या दिवशी दिलासा मिळाला. पाऊस थांबण्याबरोबर अनेक धरणांमधून नाममात्र विसर्ग सुरू राहिल्याने पुराचे पाणी गतीने ओसरत आहे. त्यामुळे शिवारांमध्ये पिके उचल्याने असह्य दुर्गंधी येत आहे.
जसे पाणी ओसरेल तसे नुकसानीची तीव्रता लक्षात जाणवत आहे. अजूनही सुमारे ५० टक्के शिवारे पाण्याखालीच आहेत. काळमवाडी, कोयना, वारणा धरणातून मंगळवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पाऊस थांबून चार दिवस झाले तरीही धरणांतील पाण्यामुळे पुराचे पाणी ओसरत नव्हते. कोयना व वारणा धरणातून २ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू केल्याने येत्या २४ तासांत वारणा, कोयना व कृष्णा नद्यांची पाणी पातळी झपाट्याने कमी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.
राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाल्याने पंचगंगा नदीचे पाणीही ओसरत आहे. मंगळवारी दुपारी नद्यांवरील सुमारे ४९ बंधारे पाण्याखाली होते. पंचगंगेची पाणीपातळी ३८ फूट ४ इंचावर होती. जिल्ह्यात बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली. धरण क्षेत्रात मात्र थांबून थांबून हलक्या सरी चालू होत्या.
‘अलमट्टी’तून दोन लाख क्युसेक विसर्ग
कोयना धरणांतून सकाळी आठ वाजता सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद केला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर बराच कमी झाल्याने मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून वारणा धरणातून सुरू असलेला ४३०० क्युसेक विसर्ग कमी करून फक्त विद्युतगृहामधून १४७५ विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे. अलमट्टी धरणातून सुमारे दोन लाख क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून विसर्गात वाढ करण्यात आलेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.