Monsoon Rain : घाटघर, रतनवाडीला विक्रमी पाऊस

Rain Update : नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील घाटघर, रतनवाडी, पांजरेसह भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोटात चोवीस तासांत विक्रमी पाऊस झाला.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील घाटघर, रतनवाडी, पांजरेसह भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोटात चोवीस तासांत विक्रमी पाऊस झाला. भंडारदरा, निळवंडे धरणांतील होणाऱ्या पाण्याच्या मोठ्या आवकेमुळे धरणातून विसर्ग वाढवला आहे. रविवारी (ता. ४) सकाळी भंडारदरा धरणातून २८ हजार २४४ क्युसेकने, तर निळवंडे धरणातून २८ हजार ३८५ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू होता. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोटातील घाटघर, पांजरे, रतनवाडी, वाकी, हरिचंद्रगड, कळसुबाई शिखर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून या भागात जोर वाढला आहे. शनिवारी दिवसभर या भागात जोरदार पाऊस कोसळला.

Monsoon Rain
Maharashtra Rain Update : पश्‍चिम, मध्य महाराष्ट्रासह कोकणात धो-धो बरसला

या पावसाळ्यात गेल्या चोवीस तासांत यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा धरण दोन दिवसांपूर्वीच तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करुन ९५ टक्के पाणीसाठा नियंत्रित ठेवून पाण्याचा विसर्ग सुरू केला. १५ सप्टेंबरपर्यंत हा विसर्ग सुरू राहील. जोरदार पावसामुळे भंडारदरा धरणात पाण्याची विक्रमी आवक होत असल्याने टप्प्याने विसर्ग वाढवला.

सध्या २७ हजार ११४ क्युसेकने विसर्ग सुरू होता. भंडारदरातील पाणी निळवंडेत येत असल्याने निळवंडे धरणात दोन दिवसांत दोन टीएमसी पाणी जमा झाले. निळवंडे ८२ टक्के भरले असल्याने आणि पाणी आवक अधिक असल्याने निळवंडेतूनही १५ हजार ५९७ क्युसेकने विसर्ग सुरू होता. हे पाणी ओझर बंधाऱ्यात येते, ओधर बंधाऱ्यातूनही पाणी विसर्ग सुरू केल्याने भंडारदरा, निळवंडेतून पाणी जायकवाडीकडे जायला सुरू झाले आहे.

Monsoon Rain
Monsoon Rain : उद्यापासून पाऊस उसंत घेणार ? विदर्भ, कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज कायम

हरिचंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा धरणातही वेगाने पाणी जमा होत असून रविवारी सकाळपर्यंत मुळा धरणात ७१ टक्के पाणीसाठा झाला होता. मुळा नदीलाही पूर आलेला होता. मुळा नदीतून धरणात २३ हजार ७६५ क्युसेकने पाणी येत होते. मुळा आणि प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पाणलोटात आजही (रविवारी) जोरदार पाऊस सुरू होता.

चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटर)

घाटघर ४७५

रतनवाडी ४४९

पांजरे ४४५

भंडारदरा २४५

निळवंडे ११६

आढळा २०

अकोले १३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com