Rain  Agrowon
हवामान

Rain Forecast : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला

Retreating Monsoon : मॉन्सून परतीला निघाल्यानंतर, राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, ‘ऑक्टोबर हीट’ चटके अनुभवायला मिळत आहेत.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून परतीला निघाल्यानंतर, राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, ‘ऑक्टोबर हीट’ चटके अनुभवायला मिळत आहेत. यातच उकाड्यामुळे चांगलाच घाम निघत आहे. आज (ता. २) सातारा, सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा मॉन्सून परतीचा प्रवास अडखळला असून, २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतला. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माऊंट अबू, दिसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा कायम आहे. पुढील दोन दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियानाच्या आणखी काही भागांसह जम्मू, काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाच्या काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे.

उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ‘ऑक्टोबर हीट’ अनुभवाला मिळत आहे.  

सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, नागपूर, अकोला, वर्धा येथे पारा पस्तिशीपार गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान पुन्हा ३३ अंशांच्या वर पोहोचले आहे. आज (ता. २) सातारा, सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह पावसाचा अंदाज

सातारा, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT