Summer Heat : उष्म्याने जिवाची लाही लाही; अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

Weather Update : कधी नव्हे इतकी उष्णता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा तीव्र स्वरूपाचे उन्ह व रात्री गरम तापमानामुळे नागरिकांचा चटके सहन करावे लागत आहेत.
Temperature
TemperatureAgrowon

Akola News : कधी नव्हे इतकी उष्णता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा तीव्र स्वरूपाचे उन्ह व रात्री गरम तापमानामुळे नागरिकांचा चटके सहन करावे लागत आहेत. गुरुवारी (ता. २३) राज्यातील सर्वाधिक कमाल ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यात झाली. हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक असून, याआधी मे महिन्यातच सन २०२२ मध्ये ४५.८ आणि सन २०१६, सन २०१७ व सन २०१८ मध्ये ४५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते.

यंदाचा उन्हाळा सातत्याने तीव्र स्वरूपाचा ठरलेला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस झाला होता. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. परिणामी, वातावरणात बदल झाला होता. मार्च महिन्यात दुसऱ्या पंधरवाड्यात व अखेरीस तर उन्हाच्या झळा जास्तच वाढल्या होत्या. त्यानंतर एप्रिलमध्ये ही जास्त तापमान नोंदविण्यात आले. त्यासोबतच अवकाळी पावसाने सुद्धा हजेरी लावली.

Temperature
Weekly Weather : ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

त्यामुळे तापमान कमी झाले होते. दरम्यान, आता पुन्हा सूर्याच्या प्रखर किरणांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे भरदुपारी घराबाहेर पडताना नागरिकांना दुपट्टा, टोपी शिवाय बाहेर पडणे अवघड झाले आहे. तीव्र उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, गत दोन, तीन दिवसांपासून अकोल्यात सूर्याच्या प्रखरतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून दररोज ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात येत आहे.

Temperature
Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

पाऱ्याची चाळिशी रोजचीच

जिल्ह्यात उन्हाचा कहर सतत वाढत आहे. त्यामुळे नागरिक दुपारी घराबाहेर जाणे टाळत आहेत. पाऱ्याची चाळिशी दररोजचीच झाली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ मे रोजी जिल्ह्याचे तापमान ४१.५ अंश सेल्सिअस, १४ मे ४१.८, १५ मे ४०.९, १६ मे ४२.४, १७ मे ४०.२, १८ मे ४२.०, १९ मे ४३.२, २० मे ४३.८, २१ मे ४३.८, २२ मे ४४.८ तर २३ मे रोजी सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

सध्या तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. परंतु अकोल्यात मात्र उन्हाची तीव्रता सर्वाधिक असल्याने सर्वांत उष्ण शहर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गुरुवारी अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com