Kolhapur Rain Update : कोल्हापुरला पावसाने झोडपले, आणखी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

Heavy Rain Fall : पावसाने शिरोळ, हातकणंगले, भुदरगड, कागल, इचलकरंजी, करवीर तालुक्यात झालेल्या पावसाने भुईमूग, भात, सोयाबीन पिकात पाणी साचून राहिले.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Updateagrowon
Published on
Updated on

Weather Forecast Kolhapur : दिवसभराच्या कडकडीत उन्हानंतर कडकडाटांसह आलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी (ता.३०) संध्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना झोडपून काढले. दरम्यान पुढचे दोन दिवस पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता कोल्हापूर वेदशाळेकडून देण्यात आली. सध्या खरिपाच्या पिके काढण्याची लगबग सुरू असताना होत असल्याने पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे अनेक भागात अंधार पसरला होता.

साडेसहाच्या सुमारास पहिल्यांदा विजांचा कडकडाट आणि त्या पाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने शिरोळ, हातकणंगले, भुदरगड, कागल, इचलकरंजी, करवीर तालुक्यात झालेल्या पावसाने भुईमूग, भात, सोयाबीन पिकात पाणी साचून राहिले. तर कोल्हापूर शहरात महाद्वार रोडसह, लक्ष्मीपुरी व्यापारी पेठेतील व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Kolhapur Rain Update
Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

कापणीला आलेले भात कोलमडून गेले

भुदरगड तालुक्यातील भातपीक क्षेत्रातील शिवार पिवळा होऊ लागला आहे. काही ठिकाणी सुगीची कामे सुरू झाली आहेत. पिंपळगाव परिसरात दोन दिवस पाऊस झाल्यामुळे कापणीला आलेले भात पीक कोलमडून गेले आहे. पावसाच्या माऱ्यामुळे लोंब्यातील पक्व दाणे झडून पडू लागल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे.

तालुक्यातील पश्चिम भागात भातरोप लावण असते. यामुळे भातपीक थोडे उशिरा कापणीला येते. या भात क्षेत्रातील शिवारास पावसाची आवश्यकता आहे. याउलट कापणीयोग्य असलेले भातपीक पावसाने भुईसपाट होत आहे. पुढील आठड्यात पिंपळगाव परिसरात कापणी, मळणीची घाई सुरू होणार आहे. सारा शिवार पिवळाधम्मक होऊन गेला आहे.

नानीबाई चिखलीत घरावर वीज कोसळली

नानीबाई चिखली येथील पंचशील नगरात मुरगुडे वस्तीत भीमा मुरगुडे यांच्या राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर वीज कोसळली. सुदैवाने यावेळी या मजल्यावर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र यामध्ये अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आज सायंकाळी सहा वाजता विजांच्या कडकडाटासह आलेला पाऊस सुमारे तीन तास कोसळत होता. वीज कोसळल्याने पाण्याची टाकी, चौकट, पत्रे फुटले असून वायरिंग पूर्णपणे जळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com