Pune News: माॅन्सून दाखल झाल्यानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई आणि पुण्यात जोरदार अधिक होता. मुंबईत तर मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली. राज्यात पडत असलेल्या पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. तर खरिपाच्या पेरण्यांची तयारी खोळंबली आहे.
हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यानुसार सकाळपासूनच या भागात पाऊस पडत होता. मुंबई आणि पुण्यात सकाळीच जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईत पावसाचा जोर जास्त होता. मुंबईच्या अनेक भागात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान अतिजोरदार पाऊस झाला. कोलाबा येथे मे महिन्यातील विक्रमी १९५ मिलिमीटर पावसाचा नोंद झाली होती. यापुर्वी १९१८ मध्ये मे महिन्यात १७९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
मुंबईत पावसाला सकाळपासूनच सुरुवात झाल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. लोकल गाड्या १० ते २० मिनिटाने उशीरा सुरु होत्या. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घारबाहेर पडू नये, असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दापोली तालुक्यात पावसाने चांगलाच तडाखा दिला. पाताडी नदीचे पाणी खेड -दापोली रस्त्यावर आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रायगड जिल्ह्यातही काही भागात जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाने जनजिवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी छोटे पुलही वाहून गेल्याचे वृत्त आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे तालुक्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. भिगवण परिसरात पुणे-सोलापूर महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
पिकांचे नुकसान
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच तडाखा देत आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुले पिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा, भुईमूग, फळबागा, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पेरण्या खोळंबल्या
मे महिन्यात मागील १० ते १५ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्यांची तयारीच करता आली नाही. अनेक भागात नांगरणीच झाली नाही, असे शेतकरी सांगत आहेत. खरिपपूर्ण मशागती नाहीत आणि आता काही दिवस वाफसा येणारन नाही, अशी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली. याचा फटका खरिपाला बसणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.