
Pune News : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे मॉन्सून खेचून आणला असून, राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. आज (ता. २६) रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून जाणार आहे. तर पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, उत्तर तेलंगणा, छत्तीसगड ते ओडिशापर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात आल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाने सरी पडत आहेत. रविवारी सकाळपर्यंत (ता. २५) दौंड येथे उच्चांकी १६० मिलीमीटर तर बारामतीमध्ये १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभर पुणे जिल्ह्यासह कोकणात पावसाचा जोर वाढला होता.
आज (ता. २६) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :
कोकण : राजापूर, रामेश्वर (कृषी) प्रत्येकी ४०, मुरूड, कुलाबा, मालवण, सांताक्रुझ प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र : दौड १६०, बारामती १३०, फलटण ७०, कर्जत, जेऊर, पाडेगाव प्रत्येकी ६०, सासवड ५०, खंडाळा, चास, जामखेड प्रत्येकी ४०, दहिवडी, इंदापूर, संगमनेर, शेवगाव, खटाव, माळशिरस, वाई प्रत्येकी ३०.
मराठवाडा : वाशी ४०, धर्माबाद, नांदेड, भूम, अर्धापूर प्रत्येकी ३०, पालम, शिरूर कासार, धारूर, पाटोदा, आंबोजोगाई प्रत्येकी २०.
विदर्भ : गडचिरोली ३०, सावोली, धानोरा प्रत्येकी २०.
रविवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---२६.६---२२.५
अहिल्यानगर---निरंक---२१.५
धुळे---३४.०---२२.४
जळगाव---३४.८---२५.०
जेऊर---२८.०---१९.५
कोल्हापूर---२५.४---२१.७
महाबळेश्वर---१९.४---१७.५
मालेगाव---३५.४---२२.४
नाशिक---२९.९---२४.०
निफाड---३०.०---२३.८
सांगली---२६.५---२२.०
सातारा---२३.०---२१.५
सोलापूर---२८.६---२३.२
सांताक्रूझ---३४.७---२४.४
डहाणू---३२.२---२७.१
रत्नागिरी---२५.६---२४.०
छत्रपती संभाजीनगर---३१.२---२४.२
धाराशिव---२८.४---२०.८
परभणी---३०.७---२३.५
परभणी (कृषी)---३१.०---निरंक
अकोला---३२.६---२६.०
अमरावती---३१.६---२३.९
बुलढाणा---२९.०---२३.६
ब्रह्मपुरी---३२.६---२४.५
चंद्रपूर---३४.२---२३.६
गडचिरोली---३२.०---२४.४
गोंदिया---३२.८---२४.६
नागपूर---३३.०---२६.७
वर्धा---३२.५---२६.६
वाशीम---३०.०---निरंक
यवतमाळ---२९.०---२३.४
मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर.
विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.