Karhad News: शेतकऱ्यांच्या उसाला किमान हमीभावाप्रमाणे पहिला हप्ता मिळावा, यासाठी दर वर्षी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला, की शेतकरी संघटनांकडून ऊसदराचे आंदोलन छेडले जाते; परंतु यंदा अपवाद वगळता संबंधित कारखाना व्यवस्थापनांनी यंदा पहिल्या हप्त्याची घोषणा न करताच, गाळप हंगाम सुरू केला आहे, तर आक्रमकपणे आंदोलनात उतरणाऱ्या शेतकरी संघटनांचा आवाजही क्षीण राहिला. परिणामत: प्रशासनासह सर्वांनाच निवडणुकीच्या गाळपात ऊसदराचा विसर पडल्याचीच स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे..केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी एकरकमी देऊन ऊसदर जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली असली, तरी जिल्ह्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना वगळता अन्य एकाही साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही..Sugarcane Crop Kolhapur : कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ, ऊस पिकाचे मोठे नुकसान.पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखान्यांचा, उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. यंदा साखर कारखान्यांचे बॉयलर पेटून कारखानेही सुरू झाले आहेत. कारखान्यांच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगाम सुरू करतानाच उसाचा पहिला हप्ता जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अपवाद वगळता त्याला अनेक कारखानदारांनी फाटाच दिला आहे. यंदा मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांनी उसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याची घोषणा गळीत हंगामाच्या प्रारंभी केली..इतर कारखानदारांनी मात्र उसाचा पहिला हप्ता जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये कारखानादारांबाबत रोष निर्माण झाला असला, तरी तो आवाज अद्याप क्षीणच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मध्यंतरी खटाव तालुक्यात उसाची वाहतूक रोखून आंदोलनाचा श्रीगणेशा केला, तर यापुढील काळात शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटनाही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते..Sugarcane Payment : उसाचे पैसे थकविल्याने शेतकऱ्यांचा संताप.मागील वर्षी ३२०० चा दरजिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळपास गेलेल्या उसाला काही कारखान्यांचा अपवाद वगळता सुमारे ३२०० ते ३२६० रुपयांचा दर दिला. त्यावेळी साखरेचे भाव ३३०० ते ३४०० रुपयांवर होते. त्यामुळे साखर कारखान्यांना तेवढा दर देता आला. त्याचबरोबर तो दर देण्यासाठी साखर कारखान्यांच्या उपपदार्थ निर्मितीचाही हातभार लागला होता..जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे नजराजिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी दर वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक होते. यंदा मात्र ती अजूनही झालेली नाही. त्यातच साखर कारखाने सुरू झाले असून, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही..तालुकानिहाय उसाचे सरासरी क्षेत्रसातारा आठ हजार ५७० हेक्टरकोरेगाव चार हजार ६६८ हेक्टरखटाव दोन हजार ६०२ हेक्टरकऱ्हाड १५ हजार ९१९ हेक्टरपाटण ८४५ हेक्टरवाई एक हजार ९१२ हेक्टरजावळी १३८ हेक्टरखंडाळा एक हजार ८८ हेक्टरफलटण सात हजार १४० हेक्टरमाण २३५ हेक्टर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.