Rainy Climate Agrowon
हवामान

Unseasonal Rain: अवकाळीचे वातावरण कधीपर्यंत असणार ? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीची शक्यता आहे का?

Rain Prediction: महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा अवकाळी पावसापासून नुकसाणीचा धोका टळू शकतो.

Anil Jadhao 

Pune News: महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा अवकाळी पावसापासून नुकसाणीचा धोका टळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.  

मागील आठवड्यात ३ ते ४ दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा, गहू यासारख्या रब्बी पिकांवर विपरित परिणाम जाणवला, असे खुळे यांनी सांगितले. तर अवकाळीच्या ह्या वातावरणामुळे लगेचच २ ते ३ अंशाने घसरलेल्या कमाल आणि किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

सध्या दिवसाचे कमाल तापमान, कोकणात ३० ते ३२ अंश तर उर्वरित महाराष्ट्रात ३६ अंशाच्या दरम्यान आणि  किमान तापमान हे  १८ ते २० अंशाच्या दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे. ही जमेची बाजू समजावी, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.

कमाल तापमानात वाढीची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी पुढील १० ते १२ दिवस म्हणजे गुढीपाडवा व त्यानंतरही २ ते ३ दिवस म्हणजे साधारण बुधवारपासून  २ एप्रिलपर्यंत कमाल व किमान तापमाने ही महाराष्ट्रात सरासरीच्या खाली असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे पिकांना मदतच होईल, असे वाटते.  शिवाय उभ्या असलेल्या रब्बी पिकांचा, गत ६० ते ६५ दिवसांचा अवकाळी व गारपिटीचा धोक्याचा काळही निभावला आहे, असे समजू या, असेही खुळे म्हणाले.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीची शक्यता जाणवते का? याविषयी बोलताना खुळे म्हणाले की, कमकुवत ‘ला-निना’ व तटस्थ ‘आयओडी’ ह्या स्थितित जरी सध्या काहीही  बदल जाणवत नसला तरी ‘एमजेओ’ ची सायकल, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या परिणामातून काय वातावरणीय बदल घडून येतील हे त्याचवेळी लघुपल्ल्याच्या अंदाजात कळून येईल. मार्चअखेरीस ह्याचाही  खुलासा होवू शकतो असे वाटते, अशी शक्यताही खुळे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT