Jowar Fodder : रब्बी पिकांचा चारा पुढील महिन्यात मिळणार

Fodder Shortage : खानदेशात पाऊसमान चांगले झाले आहे. परंतु माळरानावरील चारा संपला आहे. शेतकऱ्यांनी साठविलेला चाराही घटला आहे.
Animal Fodder
Animal Fodderagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पाऊसमान चांगले झाले आहे. परंतु माळरानावरील चारा संपला आहे. शेतकऱ्यांनी साठविलेला चाराही घटला आहे. परंतु रब्बी पिकांतून दादर ज्वारीचा कडबा यंदा मुबलक प्रमाणात मिळणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस रब्बी पिकांचा चारा मिळेल, अशी स्थिती आहे.

दादर ज्वारीचा चारा अपवाद वगळता सर्वत्र यंदा उपलब्ध होणार आहे. त्याचे दर यंदा कमी राहतील. कारण मका, संकरित ज्वारी यांची पेरणीही अपेक्षेपेक्षा अधिक आहे. हरभऱ्याची काडही मिळणार आहे. दादर ज्वारीची पेरणी कमी आहे. त्या भागात दर स्थिर राहणार आहेत. परंतु इतर भागात दर कमी राहतील, असे दिसत आहे.

मागील वेळेस कडब्याचे दर प्रतिशेकडा ३५०० ते ४५०० रुपये, असे होते. २०१८ मध्ये दर पाच हजार रुपये प्रतिशेकडा, असे होते. २०१९ मध्येही दर स्थिर होते. पण चांगल्या पावसाने सर्वच रब्बी पिकांची अपेक्षेएवढी झाली. परिणामी, दादरचा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. खानदेशात यंदा दादरची पेरणी सुमारे ३२ हजार हेक्टरवर झाली आहे.

Animal Fodder
खरिपात करा या चाऱ्याची लागवड !

दुधाळ पशुधनासह बैलजोड्यांसाठी दादरच्या कडब्याची खरेदी शेतकरी करतात. दादरची पेरणी यंदा सर्वत्र झाली आहे. तसेच संकरित दादर ज्वारी, संकरित ज्वारीची पेरणीही झाली आहे. कोरडवाहू व सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या दादरचे चांगले उत्पादन येणार आहे. त्याची खरेदी-विक्री सुरू झालेली नाही.

Animal Fodder
Sugarcane Fodder : उसाचा चारा उपलब्ध होण्यास सुरुवात

परंतु काही भागात दुधाळ पशुधनपालकांनी दादर कडब्याची आगाऊ मागणी नोंदविली आहे. चोपड्यात कडब्याची उपलब्धता अधिक असणार आहे. कडबा खरेदी केल्यानंतर त्याची कुट्टी करून कुट्टीची वाहतूक खरेदीदार करून घेतात. दादरचा कडबा जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर या भागात कमी उपलब्ध असणार आहे.

परंतु इतर भागात हा कडबा बऱ्यापैकी असणार आहे. धुळ्यात धुळे, शिंदखेडा व शिरपुरात दादर कडबा मुबलक प्रमाणात राहणार आहे. दादरचा कडबा मुबलक राहणार आहे. परंतु मक्याचा कडबाही अधिक किंवा सर्वत्र असणार आहे. मागील वेळेस चोपडा, शिरपूर भागात काही शेतकऱ्यांच्या आगाप लागवडीच्या मका पिकाच्या चाऱ्याचे दर आठ हजार रुपये एकर, असे जाहीर झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com