Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; उद्यापासून राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहणार

Rain Update : आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र उद्यापासून पावसाची उघडीप राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केले.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झालेला आहे. मात्र काही ठिकाणी अधून मधून जोरदार सरी पडत आहेत. आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र उद्यापासून पावसाची उघडीप राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केले. 

माॅन्सूनने २३ सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून माघार घेतली होती. तर २४ नोव्हेंबरलाही आणखी काही भागातून माॅन्सून परतला होता. मात्र २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान माॅन्सून एकाच जागेवर होता. म्हणजेच आजही माॅन्सूनचा प्रवास थबकला होता. 

हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या विदर्भआतील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सोमवारी आणि मंगळवारी सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT