Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Rain Prediction : नगर जिल्‍ह्याच्या काही भागांत २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विजांच्‍या कडकडाटासह वादळी वारे व जोरदार पाऊस पडेल.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्‍ह्याच्या काही भागांत २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विजांच्‍या कडकडाटासह वादळी वारे व जोरदार पाऊस पडेल. गुरुवारी (ता. २६) विजांच्‍या कडकडाटासह हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचे अवाहन केले आहे.

हवामान विभागाकडून जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांत अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भीमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.

Monsoon Rain
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने भंगले सोनेरी स्वप्न

त्यामुळे जिल्‍ह्यातील भीमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सूचनांचे पालन करावे.

Monsoon Rain
Pune Rain : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्‍थळी स्‍थलांतरीत करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष राहावे. डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्‍यावी.

वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन प्रशासनाने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com