Waiting For Rain : पुरंदरला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा

Rain Update : दोन दिवसांत केवळ भीज पाऊसच झाला. यामुळे शेतीसाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Waiting For Rain
Waiting For RainAgrowon
Published on
Updated on

Purandar News : मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वाधिक नुकसान पुरंदर तालुक्यातील सासवड व भिवडी मंडलांतील शेतकऱ्यांचे झाले. असे असताना तालुक्यातील उर्वरित कुंभारवळण, वाल्हे यांसह पाच मंडलांत पावसाने चांगलीच ओढ दिली. दोन दिवसांत केवळ भीज पाऊसच झाला. यामुळे शेतीसाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पाऊस नसल्याने पाण्याचा प्रश्न अवघड होऊ लागल्याने तालुक्यातील शेतकरी भाद्रपद पावसाची वाट पाहत आहेत. भादव्यातील वळीव पाऊस चांगला नाही पडला तर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईंला सामोरे जावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Waiting For Rain
Rain Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झालेले असताना यामध्ये एकट्या पुरंदर तालुक्यातील सासवड व भिवडी मंडलांतील मिळून ६८०२ शेतकऱ्यांची अतिपावसामुळे पिके पाण्याने बाधित झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या भागात पाऊस पडलेला असताना त्याचा लाभ त्या परिसरासह कऱ्हा नदीचा लगतचा भाग व नाझरे धरणाच्या परिसराला झाला. मात्र तालुक्यातील

Waiting For Rain
Retreating Monsoon : परतीच्या पावसाचा दणका, लातुरात घरात शिरले पाणी

उर्वरित भागात पाण्याची परिस्थिती सध्या चिंताजनक बनत चालली आहे. खरिपात पावसाने वेळेत सुरुवात चांगली केली. मात्र पिके आता पाण्याला आलेली असताना अपेक्षित प्रमाणात पाऊस नसल्याने व विहिरींना पाण्याचा साठा पुरेशा प्रमाणात नसल्याने शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. पावसाळ्यासाठी एवढाच महिना बाकी असल्याने या भाद्रपद महिन्यामध्ये जर जोराचा पाऊस न झाल्यास चालू हंगाम पार पडण्याबरोबरच पुढील रब्बी हंगामावर देखील याचा मोठा परिणाम देखील होईल अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

पुरंदर तालुक्यातील सप्टेंबर महिन्यातील पर्जन्य

महसूल मंडल सरासरी पर्जन्य प्रत्यक्ष पर्जन्य टक्के

सासवड १३२.२० ३०.८० २३.३०

भिवडी १३२.२० ४.३० ३.२५

कुंभारवळण १३२.२० २९.५० २२.३१

जेजुरी १३२.२० ८.०० ६.०५

परिंचे १३२.२० १.३० ०.९८

राजेवाडी १३२.२० ३०.३० २२.९८

वाल्हा १३२.२० ५.३० ४.०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com