Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पावसाचा धुमाकूळ; विसर्गात वाढ

Team Agrowon

Pune News : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने तुरळक ठिकाणी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी (ता.२६) ठाण्यातील वसई येथे सर्वाधिक १८९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर, विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील लहान-मोठ्या २० ते २५ धरणांतून विसर्गात वाढ केल्याने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सततच्या पावसामुळे बाजरी, कापूस, तूर, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत.

कोकणात अतिवृष्टी :

कोकणात बुधवारी सायंकाळी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तसेच मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुंबई व मुंबई उपनगर भागात १७० मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस झाला. तर, उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी होते. ठाणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. रत्नागिरीतील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. रायगडमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे भात पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. सिंधुदुर्गमध्ये गेल्या तीन-चार दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी जिल्ह्यात पावसाच्या सरी मात्र सुरू आहेत. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरीदेखील पडत आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेकडो एकर भातपीक संकटात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या तीन-चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर किंचित कमी झाला. गुरुवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली.

मध्य महाराष्ट्रात जोर वाढला

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. तसेच पश्‍चिमेकडील तालुक्यात संततधार पाऊस झाला. जिल्ह्यात २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने उरमोडी, कण्हेर धरणांतून गुरुवारी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विशेष दुष्काळी तालुक्यांना झोडपून काढले आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यांत अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. खटाव तालुक्यात मायणी येथे जोरदार पावसामुळे घरे, दुकानात पाणी शिरले होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथे सर्वाधिक १२३ मिलिमीटर पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील जवळपास १६ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. नाशिकमध्येही जोरदार पावसामुळे फळपिकांचे नुकसान होत आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. सोलापूरातही तुरळक सरी बरसत आहेत. खानदेशात कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना आधार मिळत आहे.

मराठवाड्यातील २६ मंडलांत अतिवृष्टी

मराठवाड्यात मागील आठ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. जिल्ह्यातील १७ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील सहा, बीडमधील एक व नांदेडमधील दोन मिळून चार जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात सर्वाधिक सरासरी ६३ मिलिमीटर पाऊस झाला.

विदर्भात कमी-अधिक पाऊस

विदर्भातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर काही ठिकाणी जोर कमी आहे. यामध्ये बुलडाण्यातील शेलगाव येथे ९१ मिलिमीटर, तर देऊळगाव राजा शहरात ७८, मेरा ७६, देऊळगाव राजा ग्रामीण ७०, मेहूणराजा, शेंदुर्जन ६१, अंढेरा ५४, लोणार ८१, बीबी ५१, टिटवी ७२, हिरडव ७० मिलिमीटर पाऊस झाला. तर अकोल्यातील बाभूळगाव येथे ७३ मिलिमीटर, तर पिंजर ६१ मिलिमीटर, वाशीममधील उंबरडा येथे ६४ मिलिमीटर, तर येवता ५८ मिलिमीटर, यवतमाळमधील घोटी ५१ मिलिमीटर, कुर्ली ६८ मिलिमीटर, गडचिरोलीतील ब्राह्मणी येथे ५१ मिलिमीटर, तर मुरूमगाव ५० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे काढणी केलेल्या बाजरी, कापूस, तूर अशा पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

ठाणे १०७, भाईंदर १०६, सरल १०६, उरण १३८, कुळवंडी ११८, वसई १८९, मांडवी १२५, अगशी १८२, निर्मल, मानिकपूर १२५, विरार १६४, कांचगड, मनवर, विक्रमगड १३४, अगरवाडी १०४, दहीगाव बोलका १०९, पुणे वेधशाळा, केशवनगर, खडकवासला ११३, बावडा १२३, बामणोली १००, लामज १३२, पुणतांबा १०३

गुरुवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस

कोकण : मुंब्रा ८१, कल्याण, मुरबाड ५७, नयाहडी ५८, डिघशी ५३, कुमभर्ली ५३, पोयनाड ७१, किहीम ५९, चरी, रामरज ७१, पनवेल, पवयंजे, ओवले, कर्नाळा, तळोजे, मोराबी ६४, कर्जत ६८, नेरळ ६१, कडाव ६६, कळंब ६२, चौक ६५, वौशी ५८, कापरोली, जसइ ८९, पाली, आटोने ५८, जांभूळपाडा ६०, पेण, कामरली ५२, हमरापूर, वाशी ८९, कसू ७१, महाड, नाटे, तुडली ५१, बिरवडी ५७, करंजवडी ५९, रोहा, नागोठणे ९७, चानेरा ६६, कोलाड, पोलादपूर ६५, कोंडवी ५९, वाकण ७५, मुरूड ५८, नंदगाव ७५, तळा ८९, मेढा ६५, असुर्डे ५२, शिरगांव ७५, वाकवली ६८, पालगड ९७, खेड ६८, शिर्शी ८०, आंबवली ६१, भरणे ८९, दाभीळ ८०, गुहागर ५०, मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे ९८, कोंडगाव ७६, भांबेड ५०, पालघर : वाडा, कडूस, कोणे ९८, चिंचणी ६६, पालघर ६६, बोयसर ९४, सफला ७२, तारापूर ९४, मोखडा ५४,

मध्य महाराष्ट्र : नवी बेज ५४, धारगाव ५२, नायगाव ६७, वडांगळी ८५, येवला ६६, दहादेवाडी ५४, बोराडी ५०, तामसवाडी ७४, चोरवड ५९, फत्तेपूर ७०, पाचोरा ५२, कजगाव ५७, पाळधी ६४, एरंडगाव ६१, समशेरपूर ५४, कोपरगाव ७४, राहाता ५७, शिर्डी ७६, वाघोली ५८, वेल्हा ९५, नारायणगाव ५३, न्हावरा ८०, कोरेगाव भिमा ५८, भिगवण ६१, इंदापूर ५०, काटी ६१, बोरी भडक ५४, पारगाव ८०, सावळेश्‍वर ९२, नातेपुते ५३, पाटण, म्हावशी ५१, शिंगणापूर ५३, महाबळेश्‍वर ६३, तापोळा ९७, आंबा ५१,

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर ६५, भवसिंगपूरा ७१, चिखलठाण ५२, लाडसावंगी ८९, हर्सूल ७८, चोवका ६७, पिसादेवी ६३, शेकटा ५०, वरूडकाझी ६३, बाळानगर ६५, बिडकीन ५७, पैठण ६१, निळजगाव ५७, गंगापूर ५७, मांजरी ६९, शेंदूरवाडा ६७, तुर्काबाद ६१, हर्सूल ५५, जामगाव ५७, वैजापूर ९७, महालगाव ८३, नागमठाण ७४, लाडगाव, दहीगाव ९७, बाबतारा ११०, गोळेगाव ६२, आंभाई ६७, पाळोद ६३, शिवना ५२, बनोटी ८०, फुलब्री ६२, पिरबावडा ७७, धावडा ७३, जाफ्राबाद ६८, टेंभुर्णी ८०, वागरूळ ७०, दाभाडी ६८, ढोकसळ ९३, पाटोदा ७२, चांडोळा ८३, इस्लापूर ५७, दहेली ६३, मुदखेड ७१

(मिलिमीटरमध्ये : स्त्रोत-कृषी विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : जलसंवर्धन, ग्रामविकासात ‘जीआयएस’ महत्त्वाचे...

Flaws in Democracy : लोकशाहीतील दोष दूर करण्यासाठी...

Fertilizers Use : पर्यायी खतांचा करा परिणामकारक वापर

Voluntary Retirement : ‘महानंद’च्या ४६७ कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती

Sugar Factory Repayment : साखर कारखान्यांवरील थकहमी परतफेडीसाठी लागणार साधे बंधपत्र

SCROLL FOR NEXT