Crops Protection from Wild Animals: जंगली प्राणी अनेकवेळा पिकांची नासधूस करतात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या एका गटाने शेतकऱ्यांसाठी असे एक अनोखे उपकरण बनविले आहे; जे जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करेल. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या एका गटाने इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) च्या आधारे एक नाविन्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. जे शेतकऱ्यांना जंगली प्राणी आणि पक्ष्यांपासून त्यांच्या शेतपिकांचे संरक्षण करण्यास मदत करू शकेल..मास सर्व्हेलन्स क्रॉप सिस्टीम नावाने ही नवीन प्रणाली आहे. याचा डोंगराळ भागात माकडे, रानडुक्कर यांसारख्या जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नासाडीच्या समस्येवर उपाय शोधण्याचा उद्देश आहे. माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विभागप्रमुख पंकज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण विकसित केले आहे..Agricultural Credit: शेती कर्ज वितरण वाढवा, FPO च्या सोयीनुसार योजना आखा, अर्थमंत्री सीतारामन यांचे ग्रामीण बँकांना निर्देश.ठाकूर यांच्या माहितीनुसार, हे उपकरण एका सेन्सरप्रमाणे काम करते. जेव्हा प्राणी अथवा पक्षी शेताजवळ येतात तेव्हा या उपकरणातून बंदुकीच्या गोळीसारखा मोठा आवाज येतो. यामुळे प्राणी, पक्षी घाबरून शेतापासून दूर जातात..या प्रकल्पाबद्दल बोलताना ठाकूर यांनी सांगितले की, दरवर्षी जंगली प्राण्यांमुळे शेतपिकांची नासधूस होते. परिणामी, शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. यामुळे हे उपकरण शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरू शकेल..Sustainable Agriculture: शाश्वत शेतीसाठी आधुनिकतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक."माकडे, रानडुक्कर आणि इतर जंगली प्राणी अनेकदा डोंगराळ भागात पिकांची नासधूस करतात. त्यांना पिकांपासून दूर घालवण्यासाठी हे उपकरण प्रभावी ठरू शकते," असे ते पुढे म्हणाले. .या प्रकल्पावर काम करणारे विद्यार्थी अंजली आणि सचिन चौधरी सांगतात की, हे उपकरण खूप कमी खर्चात तयार करण्यात आले आहे. शेताजवळ कोणतीही हालचाल झाल्यास हे उपकरण आपोआप सक्रिय होते. यामुळे शेताची सतत राखण करण्याची गरज नाही. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांप्रमाणे, सातत्याने रेकॉर्ड करत नाही अथवा डेटा साठवून ठेवत नाही. पण जेव्हा एखादा प्राणी अथवा पक्षी जवळ येतो; तेव्हाच ते सक्रिय होते..हे नविन्यपूर्ण उपकरण भारतातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील, तंत्रज्ञानावर आधारित शेतपिकांचे नुकसान टाळण्याच्या उपायांच्या वाढत्या ट्रेंडचा एक भाग आहे. विशेष म्हणजे हे उपकरण खूप कमी खर्चात विकसित करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.