Rain Update : मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ४२९८ मिलिमीटर पाऊस

Mulshi Dam : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. मुळशी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Mulshi Dam
Mulshi DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. मुळशी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील दोन महिन्यांत या धरणक्षेत्रात सर्वाधिक ४ हजार २९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

गेल्या वर्षी याच काळात ३ हजार ७११ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा धरणक्षेत्रात ५८७ मिलिमीटर अधिक पाऊस पडला आहे. आतापर्यंत धरणांत १९.९० टीएमसी पाणी दाखल झाले आहे.

Mulshi Dam
Rain Update : मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस

यंदा १५ जूनपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. तर पश्चिम भागात पावसाचा प्रभाव कमी होता. त्यामुळे धरणक्षेत्रात पाऊस पडतो की नाही, अशी शंका होती. परंतु जुलैमध्ये पावसाने चांगलेच झोडपून काढले. सात जुलैच्या दरम्यान पावसाने पुन्हा सुरवात केली आहे.

पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. तर काही वेळा पावसाचा जोर कमी- अधिक होत होता. तर २५ जुलै रोजी जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाने चांगलेच तांडव केले आहे. मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ४८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या धरणांत २४ तासांमध्ये २.७१ टीएमसी पाण्याची आवक झाली होती.

मुळशी धरणांची एकूण उपलब्ध पाण्याची क्षमता २०.१६ टीएमसी आहे. गेल्या वर्षी याच काळात या धरणात १६.१७ टीएमसी म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा झाला होता. परंतु चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे २६ जुलै रोजी

Mulshi Dam
Pune Rain Update : मुळशी धरण क्षेत्रात ११४ मिलिमीटर पाऊस

या धरणांतून १० हजार ७०० क्युसेक, २७ जुलै रोजी २ हजार २७१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला गेला. त्यानंतर तीन दिवस पुन्हा विसर्ग बंद करण्यात आला. त्यानंतर बुधवारी (ता.३१) सकाळी पुन्हा २ हजार ४६० क्युसेकने सांडव्याला विसर्ग सोडण्यात आला आहे. ओढे, नाले भरून वाहत असल्याने धरणातील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.

चोवीस तासांत २२६ मिलिमीटर पाऊस

बुधवारी (ता.३१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २२६ मिलिमीटर पाऊस झाला असून या दरम्यान धरणामध्ये नव्याने ०.८० टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणांत १८.२७ टीएमसी म्हणजेच ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com