सुदर्शन सुतारRural Development: गावात विविध पायाभूत सुविधा देण्यासह जलसंधारणाच्या विविध कामांतून तब्बल ६५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात भेंड (जि, सोलापूर, ता. माढा) गावाला यश मिळाले आहे. गावाला मिळालेले उच्चशिक्षित दळवी दांपत्याचे नेतृत्व, ग्रामस्थांची साथ, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेने माहिती केंद्र या गावच्या प्रगतीच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. प्रगती, विकासाचं तोरण बांधणारं भेंड गाव संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत असेच आहे. .सोलापूर-पुणे महामार्गावर तीर्थक्षेत्र अरणपासून अवघ्या सहा किलोमीटरवर भेंड (जि. सोलापूर, ता. माढा) हे गाव लागते. सुमारे चार हजार लोकसंख्येच्या या गावची वेगळी ओळख म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज यांची सासुरवाडी आणि संत जनाबाई यांचे हे माहेर आहे. आज आपल्या कर्तृत्वातून केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही गावानं नाव तयार केलं आहे..गावचं नेतृत्व उच्चशिक्षित आणि गावाविषयी आत्मीयता असलेल्या व्यक्तीकडे गेल्यानंतर काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण भेंडनं घालून दिलं आहे. माजी सरपंच डॉ. संतोष दळवी यांनी पाच वर्षे लोकनियुक्त सरपंचपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यानंतर त्यांची पत्नी डॉ. मनीषा यांनीही पुढील पाच वर्षे ही धुरा यशस्वीपणे पेलली..Model Village : हिवरे बाजारला पावसाने उपलब्ध झाले ५११.८६ कोटी लिटर पाणी.उपसरपंच सौ. विमल गायकवाड, उषा मते, कल्पना घुगे, गजानन परबत, प्रभाकर दळवी, धनाजी जानराव, पल्लवी बरडे, यशवंत दळवी, राजाबाई जाधव या सदस्यांसह ग्रामसेवक महादेव देवकते, विकास दळवी यांचे दळवी दांपत्याला मोठे पाठबळ मिळाले. विशेष म्हणजे शेजारच्या मोडनिंब गावात आपला वैद्यकीय पेशा सांभाळून हे दांपत्य गावासाठी आजही कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वानं गावाला विकासाभिमुख चेहऱ्याची ओळख मिळाली आहे.....अशा आहेत गावातील पायाभूत सुविधासर्व रस्ते सिमेंटचे. विजेची पुरेशी सोय.प्रत्येक घरी नळ योजना राबवताना प्रत्येक कुटुंबात प्रति व्यक्ती २५ लिटर पाणी देण्याचा निर्णय.राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेतंर्गत ३६ बायोगॅस प्रकल्प. शिवाय आणखी १०० प्रकल्प प्रस्तावित.१४४ ठिकाणी सौरदिवे, दोन ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे पंप.प्रोत्साहनातून १५ ते २० कुटुंबांकडे परसबागपूर्णपणे दारुबंदी.प्राथमिक शाळेची आकर्षक रंगरंगोटी. आवश्यक सर्व साहित्यांची उपलब्धता. त्यामुळेच जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त..जलस्रोतांचे बळकटीकरणजलस्रोत बळकटीकरण आणि भूजल पुनर्भरणावर झाले विशेष काम.पाणी फाउंडेशन, अटल भूजल योजना लोकसहभागाचे मिळाले पाठबळ.सलग समतल चर १५ हेक्टर, खोल समतल चर पाच हेक्टर, गाळ काढणी २० हजार घनमीटरपर्यंत अशी झाली कामे.पाणीपातळी वाढण्यासाठी १२५ ठिकाणी रिचार्ज शाफ्ट.विहीर पुनर्भरणाची ५७, माती नालाबांधची १० हेक्टरवर कामे..चार पाझर तलावांतील गाळ काढणे, ओढा रुंदी- खोलीकरण, जल मुरवण खड्डा, गॅबियन बंधारे, शेततळे, बांधबंदिस्ती.गाव कार्यक्षेत्रात तब्बल तीन लाख क्युबिक मीटर पाणीसाठा झाला तयार.पाणी बचतीसाठी ग्रामपंचायतीकडून प्रबोधन आणि ठराव.शेतातील पाण्याची पाइपलाइन बंदिस्त असली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचना तसेच गरजेनुसार मल्चिंग पेपरचा वापर केला पाहिजे, नळांना तोट्या बसवून पाणी वाया जाऊ द्यायचे नाही असे नियम घालण्यात आले.पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था..Apshinge Military Village : ‘इथे जन्मती वीर जवान’.सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनपाण्याची पुरेशी उपलब्धता झाल्याने ऊस, कांद्यासह केळी, पेरू, लिंबू, डाळिंब अशी सुमारे २४० हेक्टरवर फळबागांची लागवड झाली आहे. सुमारे ६५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आले आहे. सुमारे १५० हेक्टरवर सूक्ष्म सिंचनाचा तर १०० हेक्टरवर मल्चिंग पेपरचा वापर होत आहे. बीबीएफ तंत्रज्ञानाला चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांचे दहा गट कार्यरत आहेत,. पैकी ‘युनिव्हर्सल ऑरगॅनिक फार्मर’ हा सेंद्रिय शेतीत कार्य करणारा गट आहे. त्या माध्यमातून सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केला जातो. दहा शेतकरी सेंद्रिय खतांचे उत्पादन घेतात. त्यातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस लागला आहे. वृक्ष लागवडीच्या चळवळीतून माळावर ऑक्सिजन पार्क आकाराला आला आहे. दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने चाळीस शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीसाठी बॅगा पुरविण्यात आल्या आहेत..प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा मुक्कामगावाने राबविलेले उपक्रम व विकासकामांची पाहणी व अभ्यासासाठी ‘यशदा’ संस्थेमार्फत दोन राज्य कर आयुक्त, दोन पोलिस उपअधीक्षक, एक शिक्षणाधिकारी, एक मुख्याधिकारी व एक महिला बालविकास अधिकारी असे उच्च श्रेणीतील अधिकारी गावात सात दिवस मुक्कामी होते. ग्रामपंचायतीसाठी हा गौरवपूर्ण क्षण होता..विविध पुरस्कारांवर मोहोरकेंद्र शासन आणि जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल अंतर्गत योजनेत समावेश. अटल भूजल स्पर्धा (२०२२-२३) प्रथम पारितोषिक.नमो आत्मनिर्भर अभियानांतर्गत गावाची निवड.आर.आर.आबा (पाटील) सुंदर गाव योजनेतून तालुका, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक.पाणी फाऊंडेशन अंतर्गत २०१८ व २०१९ मध्ये तालुक्यातून सलग दोन वर्षे तृतीय क्रमांक.ग्रामपंचायत सुशासन, आर्थिक सक्षमीकरण अभियानात तालुक्यात प्रथम.माझी वसुंधरा अभियानात समावेश, संत जनाबाई तीर्थ क्षेत्रास क दर्जा प्राप्त.स्वच्छतेसह तंटामुक्त गाव..इक्रिसॅटने थाटले माहिती केंद्रभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून इक्रिसॅट या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेने (हैदराबाद) गावात माहिती केंद्र उभारले आहे. यात पाणी- पिकांची मॉडेल्स, झालेली कामे, चित्रफिती यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सात गावांची निवड या प्रकल्पासाठी झाली. त्यात भेंडचा समावेश होता. भूजल सर्व्हेक्षणचे तत्कालीन आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प भेंडमध्ये आला प्रकल्प प्रमुख डॉ. कौशल गर्ग, शास्त्रज्ञ डॉ.इस्रार मजीद, भूजल सर्व्हेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख, वैज्ञानिक अधिकारी सागर रामदासी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. गावात निरगुडी तलाव आहे, मात्र गळती होत असल्याने तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच रिकामा व्हायचा. या पार्श्वभूमीवर २७२ मीटर लांबी आणि नऊ इंच जाडीचा कोअरवॉल इक्रिसॅटच्या मदतीने बांधण्यात आला. .आता सुमारे शंभर एकराला पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता होऊ शकली आहे. पाण्याची गळती थांबली आहे. विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने भरडधान्यांच्या लागवडीला चालना मिळाली. आहारातील त्यांचे महत्त्व ओळखून ५० हून अधिक शेतकऱ्यांनी त्यांची लागवड केली. कमी पाण्यात येणाऱ्या तुरीचे आयसीपीव्ही २१३३३ हे वाण इक्रिसॅटने विकसित केले आहे. त्याचीही लागवड झाली. मागील वर्षी नाचणीचे एकरी ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन काहींनी घेतले. त्यापासून बिस्किटे, पापड आदी पदार्थ तयार केले. इक्रिसॅटच्या माहिती केंद्रात स्वयंचलित हवामान केंद्र, वाहून जाणाऱ्या पावसाची मोजणी करणारे, मातीची ओल तपासणी करणारे, फ्लो मीटर आदी यंत्रेही उपलब्ध आहेत..स्वच्छता, जलसंधारण, सौरऊर्जा, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातील शासनाच्या सर्व योजना राबवल्या. शेतीसाठी शाश्वत पाणीसाठा वाढवण्याचे भरीव काम करता आले. ग्रामस्थांच्या पाठबळामुळेच सर्व गोष्टी शक्य झाल्या. पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच. त्या पलीकडे जाऊन गावाचा विकास साधला आला याचे समाधान आहे.डॉ. मनीषा दळवी, सरपंच, डॉ. संतोष दळवी, माजी सरपंच (८९७५००२००१).गाव तलावाला कोअरवॅाल उभारण्याची संकल्पना गावात यशस्वी झाली. पाण्याची बचत व वापर यावर काम झाले पाहिजे. प्रत्येक गावात जागृती व्हायला हवी.डॉ. कौशल गर्ग, प्रकल्प प्रमुख, इक्रिसॅट, हैदराबाद.जलसंधारण, पीकपद्धती यांच्यासह ग्रामपंचायतीने केलेले वृक्षारोपण, बायोगॅस प्रकल्प आदी अनेक गोष्टी भेंड गावाला वेगळेपणा बहाल करतात. विकासाचं एकेक पाऊल पुढे टाकतो आहे याचे समाधान आहे.बालाजी भास्कर दळवी, शेतकरी, भेंड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.