Monsoon Agrowon
हवामान

Retreat Monsoon : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार

Team Agrowon

Pune News : परतीचा प्रवास सुरू असताना राज्यातील वातावरणात बदल होत आहे. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील ठाणे, रायगड जिल्ह्यांत हलका, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. गुरुवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापुरातील मैंदर्गी येथे ६२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

पावसाने उघडीप दिल्यानंतर कडक ऊन पडत आहे. परंतु काही ठिकाणी दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील  टिटवाळा, नडगाव येथे हलक्या सरी पडल्या.

रायगडमधील चौक येथे ३१ मिलिमीटर, बिरवडी २३ मिलिमीटर, तर नेरळ, कळंब, कशेले, लोणेरे, वाकण येथे तुरळक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिकमधील वेहेळगाव येथे ३६ मिलिमीटर, तर नडगाव, बनगाव येथे हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यात पहाटे धुक्याची स्थिती, तर सकाळपासून ऊन पडत असले तरी दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. दौंड येथे ४७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.  

नगर जिल्ह्यात बेलवंडी येथे ४६ मिलिमीटर, कोळगाव ४१, चिंभळा ३०, टाकळी २७ मिलिमीटर, तर  काष्टी, पेंडगाव, भांबोरा, खर्डा हलका पाऊस झाला. सोलापुरातील वळसंग ३१, सुर्डी ३०, अक्कलकोट २९, दुधनी ४४, मैंदर्गी ६२, वागदरी ३०, दारफळ ३९, म्हैसगाव ४९, जेऊर, उमरड ३८ मिलिमीटर, साताऱ्यातील कुमठे २४, किन्हई ३०, वडूज २९, कुक्‍कुडवाड ४८ मिलिमीटर, सांगलीतील मनेराजुरी ३६, कवठेमहांकाळ ५५, हिंगणगाव ३५, खानदेशातील जळगावमधील अंतुर्ली येथे ३४ मिलिमीटर पाऊस पडला.

मराठवाड्यातील जालन्यातील वाडीगोद्री येथे २७ मिलिमीटर,  बीडमधील दिदरूड येथे हलका पाऊस झाला. परभणीतील गंगाखेड, माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी येथे हलका पाऊस बरसला. विदर्भात अकोला, यवतमाळमध्ये तुरळक सरी पडल्या असून अकोल्यातील मूर्तिजापूर येथे हलका, यवतमाळमधील सावर येथे ४९ मिलिमीटर, तर कोपरा, हिवरी येथे सरी पडल्या. त्यामुळे कापूस वेचणी कामात अडथळे येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bail Pola : पुणे जिल्ह्यात भाद्रपदी बैलपोळा उत्‍साहात

Agricultural Services Examination : निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या कधी?

Hirda Tree : हिरडा झाडांची सात-बारा उताऱ्यावर होणार नोंद

Kisan Rail : किसान रेल्वेसाठी सोमवारी शेतकरी संघटनांचे आंदोलन

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुढच्या नऊ हप्त्यांची तरतूद

SCROLL FOR NEXT