Maharashtra Rain : दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी

Rain Update : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता सकाळी धुक्याची चादर पसरू लागली आहे. तर अनेक ठिकाणी शेतीकामांना वेग येऊ लागला आहे. मात्र काही ठिकाणी अधूनमधून तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे.
Weather
WeatherAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता सकाळी धुक्याची चादर पसरू लागली आहे. तर अनेक ठिकाणी शेतीकामांना वेग येऊ लागला आहे. मात्र काही ठिकाणी अधूनमधून तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बुधवारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथे ६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

मागील आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे मराठवाडा विदर्भात पिके वाफसा अवस्थेत येऊ लागली असून, कापूस वेचणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी बाजरीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील कासार बालकुंड येथे ३३ मिलिमीटर, तर आंबुलगा ११, हलगरा २३, हेर २८, रेणापूर २१ मिलिमीटर, धाराशिवमधील सालगारा, नळदुर्ग, लोहारा येथे ३९ मिलिमीटर, तर तुळजापूर २२, सावरगाव २५, मंगरूळ २७, इतकल येथे ४४ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील चंद्रपूरमधील चिखली, बह्मपुरी, अन्हेर, चौगण, सावळी, गडचिरोलीतील अरमोरी येथे पावसाचा शिडकावा झाला.

Weather
Rain Forecast : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला

कोकणात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे भात पिके निसवण्याच्या, तर काही ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सिंधुदुर्गमधील आंबोली, मडुरा, वेंगुर्ला, वेतोरे, तलवट, भेडसी येथे तुरळक सरी बरसल्या. तर उर्वरित भागात ऊन पडले होते. खानदेशातील नंदूरबारमधील बोरद, जळगावमधील चोपडा येथे हलक्या सरी पडल्या.

Weather
Return Monsoon : माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु; राज्यात काही भागात पावसाचा अंदाज 

मध्य महाराष्ट्रातील नाशिकमधील रानवड येथे ३३ मिलिमीटर, तर उमराळे ३०, ननाशी, वडाळी २३, वडनेर ११ मिलिमीटर पाऊस झाला. तर पुण्यातील भोलावडे येथे तुरळक सरी कोसळल्या. सोलापुरातील बोरामणी येथे ४५ मिलिमीटर, तर वळसंग ३४, मुस्ती ४४, चपळगाव ३६ मिलिमीटर, साताऱ्यातील पसरणी येथे ४८ मिलिमीटर, तर सातारा, खेड २८, वर्ये, शिरेबे २१, मेढा, तापोळा, आनेवाडी ३३, बामणोली २४, तळमावले ३२, वाठार-किरोली २२, धोम २७, वाई ३६,

महाबळेश्‍वर २७, पाचगणी ४७, लामज ३५ मिलिमीटर, सांगलीतील कुची ३८ मिलिमीटर, तर मुचंडी ३७, कुंभारी २३, भाळवणी २२, मांजर्डे २७, सावळज २०, कवठेमहांकाळ ३५, हिंगणगाव २९ मिलिमीटर, कोल्हापुरातील वाठार येथे ४० मिलिमीटर, तर इचलकरंजी १३, वाडी-रत्नागिरी २८ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com