Pune News : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अजूनही हलका ते मध्यम सरी पडत आहेत. शनिवारी (ता.३१) सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूरमधील रामटेक येथे ७६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
गेले आठवडाभर मराठवाडा विदर्भात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कडक ऊन पडत असून शेतीकामांना वेग येऊ लागला आहे. परंतु अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. तर वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.
यामध्ये वाशीममधील रिठद येथे २७ मिलिमीटर, अमरावतीतील वरूड ६०, शिरखेड ४०, वाडळी ३७ मिलिमीटर, यवतमाळमधील मार्डी, कुंभा येथे ४६ मिलिमीटर, तर घारफळ २६ मिलिमीटर, वर्ध्यातील तळेगाव येथे ६२ मिलिमीटर, कारंजा, ठाणेगाव, सिल्लोड येथे ४८ मिलिमीटर पाऊस झाला.
नागपूरमधील हिंगणा, वानाडोंगरी येथे ४४ मिलिमीटर, तर नागपूर, सीताबर्डी ४१ मिलिमीटर पाऊस झाला. भंडाऱ्यातील पवनी येथे ३२ मिलिमीटर, गोंदियातील दारव्हा ४७, शेंडा २५ मिलिमीटर, चंद्रपूरताली खांबडा येथे ५२ मिलिमीटर, तर कोपर्णा ४५, तेमुर्डा, चिकणी २० मिलिमीटर पाऊस पडला. गडचिरोलीत बऱ्यापैकी पाऊस पडला.
रत्नागिरीतील खेडशी येथे ४३ मिलिमीटर, तर पाली ३२ मिलिमीटर, तर दापोली, वेळवी, फसोप, माभळे, नाटे येथे हलका पाऊस झाला. सिंधुदुर्गमध्येही भेडशी येथे ५५, वालावल ४७, फोंडा ३३ मिलिमीटर, तर पाटगाव, पिंगुळी, श्रावण, आजगाव, आबोली, तळवट, कणकवली, सांगवे, नांदगाव, कुडाळ, माणगावमध्ये हलका पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रातील खानदेशात पावसाने उघडीप दिली आहे.
जळगावमधील मेहुणबारे, खडकी येथे ३४ मिलिमीटर, तर चाळीसगाव ३१, बहाळ २६ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ३२ मिलिमीटर कोल्हापुरातील चंदगड, नारंगवाडी, हेरे येथे २६ मिमी पाऊस झाला.
मराठवाड्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील आंभाई येथे २८ मिलिमीटर, तर शिवना २६, जरांदी २२ मिलिमीटर, जालन्यातील पिंपळगाव येथे ४३ मिलिमीटर, तर कु. पिंपळगाव ३०, जांबसमर्थ, शेवळी २१ मिलिमीटर, बीडमधील नेकनूर येथे ३३ मिलिमीटर, मांजरसुंबा, धारूर २८, विडा, माजलगाव, नांदूरघाट २५ मिलिमीटर, लातूरमधील नागलगाव ३४, मोघा २७ मिलिमीटर, धाराशीवमधील इतकूर येथे ३७ मिलिमीटर,परभणीतील रामपुरी ४२, आवळगाव ३५, मानवत, काकरजावळा ३२, शेळगाव ३० मिलिमीटर, तर महातपुरी, हदगाव, माखणी, पाथरी, कसापुरी, बाभळगाव येथे हलका पाऊस पडला.
शनिवारी (ता.३१) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये विदर्भ अमरावती २०, नेवसरी २१, अमळा २९, शेंदुर्जना, कन्नमवरग्राम, वायगाव, अजानसिंगी ३२, पुसाळा, खापरी, नेरपिंगळाई ३४, बटकुली, कासंसूर, पेंटीपका २५, आर्वी, वाथोडा ४३, वाढोणा ३१, विजय गोपाल, भिडी, वाळगाव २७, कान्होलीबारा ३०, नागरधन ३५, पारशिवणी २४, नावेगाव २२, सावरगाव ३३, कळमेश्वर, धापेवडा ३२, सिरोंचा २९, असारळी ३१, तरडगाव ६७, भामरागड ४२,
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.